तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 17 May 2018

रमजान महिन्यात भारनियमन करू नये;युवक काँग्रेसची निवेदनाव्दारे मागणी

प्रतिनिधी
परतुर:-मुस्लिम समाजाच्या  पवित्र रमजान महिना सुरू होत आहे. या वेळी मुस्लीम बांधव रोजे  धरतात त्यामुळे या महिण्यात उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून विजेचे भारनियमन रद्द करावे. अशी मागणी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष इब्राहिम कायमखानी यांच्या वतिने वीज वितरण कंपनीचे  अभियंता यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
परतुर शहर आणि तालुक्यात वीज वितरणच्या वतीने दरदिवशी भारनियमन करण्यात येते  या वर्षीचा पवित्र रमजान महिना दिनांक 17 मे पासुन सुरू होत असुन या काळात मुस्लीम बांधव पहाटे तीन वाजल्या पासून धार्मीक कार्यास सुरूवात करतात त्यामुळे महावितरणच्या वतीने करण्यात येणारे भारनियमन गैरसोईचे होत असल्याने शहर आणि तालुक्यातील विजेचे भारनियमन रद्द करण्याची मागणी कनिष्ठ अभियंता परतुर यांच्याकडे युवक काँग्रेस व इब्राहिम भैय्या कायमखानी  मिञमंडळाच्या वतीने एका निवेदनाद्वारे करण्या आली.यावेळी न.प गट नेते बाबुराव हिवाळे,हाजी शरीफ कुरैशी,वैजीनाथ दादा बागल,माहवीर जैन, रज्जक कुरैशी,विशनु मचाले, मुज्जमील खान, महेबुब शेख, सोहेल शेख, शोएब शेख,उपस्थित होते.

No comments:

Post a Comment