तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 16 May 2018

मंगरुळपीर येथे नाफेडअंतर्गत तुर व हरभरा खरेदी करन्याच्या मागणीसाठी शेतकर्‍याचे धरणे


मंगरुळपीरः शेतकर्‍याच्या घरातील तुर व हरभर्‍याचा शेवटचा दाणा संपेपर्यत नाफेड अंतर्गत खरेदी करावा अशी मागणी मंगरुळपीर तालुका काग्रेसचे अध्यक्ष मिलीद पाकधने यांच्या नेतृत्वात केली होती पण सबंधित प्रशासनाकडुन दखल घेतली नाही म्हणून दि.१६ रोजी मंगरुळपीर तहसिल समोर शेतकर्‍यांनी एकदिवशीय धरणे  आंदोलन सुरु केले आहे.
मंगरुळपीर तालुक्यातील दि 7/5/2018 रोजी नाफेडतर्गत तुर व हरभर्‍याची जलदगतीने खरेदी करावी असे निवेदन दिले होते.असे असतांना परंतु त्या दिवसापासून आजपर्यत  कारवाई करण्यात अाली नाही अजुनही  शेतकर्‍याचा शेतकर्‍याचा घरातील तुर व हरभरा तसाच पडुन आहे याशिवाय तुरीचे चुकारे 2 महीण्यापासुन प्रलंबीत आहे चुकारे त्वरीत अदा करण्यात यावे व यानंतर माल खरेदीनंतर तात्काळ मालाचे पैसे शेतकर्‍याच्या खात्यात जमा करावे दि 15 मे पासुन नाफेड अंतर्गत सुरु असलेली खरेदी बंद होत आहे परंतु अनेक शेतकर्‍यानी नोंदणीसाठी कागदपत्रे दिली आहेत परंतु त्याची आॅनलाईन नोदणी झालेली नाही त्याची नोदणी तात्काळ करुन माल खरेदी करावा या मागण्याचे लक्ष वेधुन घेण्याकरीता  दि 16 रोजी 10 वाजता तहसील परिसरात धरणे आंदोलन केले आहे. याची दखल घेऊन मागण्या पुर्ण कराव्या अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.                                                                     फुलचंद भगत मंगरुळपीर/वाशिम मो.9763007835

No comments:

Post a Comment