तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 18 May 2018

तुळजापुर आणि वरुड परिसरातील नादुरुस्त तलाव दुरुस्त करन्याची मागणी

फुलचंद भगत

मंगरुळपीर-मौजे तुळजापुर आणी वरुड परिसरातील नादुरुस्त असलेले तलाव दुरुस्त करावे आणी आम्हा शेतकर्‍यांना सिंचनाची सोय ऊपलब्ध करुन देन्याची मागणी दि.१७ रोजी आमदार राजेंद्र पाटणी यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे.

 अनियमित प्रजन्यमानामुळे आणी मागील पाच वर्षापासुनच्या सततच्या नापीकीमुळे कुटुंबाचा ऊदरनिर्वाह करणे दुरापास्त झाले आहे.तुळजापुर आणी वरुड आमचे शेतीलगतच जुने तलाव असुन ते बर्‍याच दिवसापासुन तलावाच्या भिंतीमधुन पान्याची गळतीमुळे तलाव नादुरुस्त झाले आहे.या तलावावाच्या देखभाल दुरुस्तीचे काम जिल्हापरिषदेकडे आहे त्यामुळे या विभागाला वारवांर दुरुस्तीसाठी मागणी केली होती परंतु अद्यापपर्यत दुरुस्तीचे काम केले नाही.या तलावाची निर्मीती १९६० पुर्वीची असुन तलावाचे बांधकाम कालबाह्य झालेले आहे म्हणून सदर तलाव हे जलसंपदा विभागाकडे वर्ग करुन नव्याने बांधकाम करन्यासाठी पुढाकार घ्यावा.या तलाव दुरुस्तीमुळे बहुतांश शेतकर्‍यांच्या जमीनी सिंचनाखाली येतील व याचा सर्व शेतकर्‍यांना होईल त्यामुळे तलाव दुरुस्तीचे काम तात्काळ मार्गी लावन्याच्या मागणीचे लेखी निवेदन आमदार पाटणीला शेतकर्‍यांनी सादर केले आहे.या निवेदनावर साहेबराव सुर्वे,विठ्ठल बर्गे,खन्नू नंदावाले आदीच्या स्वाक्षर्‍या आहे.

फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.9763007835

No comments:

Post a Comment