मा.आ.बाबाजानी दुर्रानी साहेबांची विधानपरिषदेवर राकाँ कोट्यातून बिनविरोध निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि वाढदिवसा निमित्त तेजन्यूज हेडलाईन्स कडून हार्दिक शुभेच्छा...!

Thursday, 17 May 2018

कर्नाटकातल्या भाजपच्या अरेरावीनंतर. गोवा, बिहारमध्ये विरोधकांच्या हालचाली.


कर्नाटकात बहुमतासाठी आघाडी करूनही सत्तेपासून दूर राहिलेल्या काँग्रेसनं आता भाजपचा वचपा काढण्याची तयारी सुरू केलीय. याच्या हालचाली गोव्यात सुरू केल्या आहेत. गोव्यात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे कर्नाटकातला नियम लागू करत गोव्याच्या राज्यपालांनी काँग्रेसला सत्ता स्थापनेचं निमंत्रण द्यावं, अशी मागणी गोवा काँग्रेसनं केलीय. एवढंच नव्हे तर काँग्रेसच्या आमदारांची राज्यपालांसमोर परेड करण्यासाठीही हालचारी सुरू केल्या आहेत. त्यामुळे कर्नाटकापाठोपाठ गोव्यातही सत्तासंघर्ष पेटण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. तर दुसरीकडे बिहारमध्येही राष्ट्रीय जनता दलनं सर्वात मोठा पक्ष असल्यानं राज्यपालांना भेटण्याचा निर्णय घेतलाय. आरजेडीचे नेते आणि लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव उद्या राज्यपालांची भेट घेणार आहेत. त्यामुळं आता कर्नाटकातल्या राज्यपालांच्या निर्णयाचे इतर राज्यांमध्येही पडसाद उमटू लागले आहेत. त्यामुळे भाजपसमोर अडचणी उभ्या राहण्याची शक्यता आहे.

सत्तासंघर्ष कोर्टात ...

कर्नाटकमधील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात  पोहोचलाय. भाजप समर्थक आमदारांची यादी सादर करण्याची नोटीस सर्वोच्च न्यायालयाने येडियुरप्पांना बजावलीय. याप्रकरणी उद्या सकाळी साडेदहा वाजता सुनावणी होणार आहे. मध्यरात्रीनंतर सर्वोच्च न्यायालयात काँग्रेस आणि भाजपच्या वकीलांमध्ये युक्तीवादाचा जोरादार फड रंगला. सर्वोच्च न्यायालयानं शपथविधीला स्थगिती देण्यास नकार दिलेला असला, तरी राज्यपालांनी येडियुरप्पांना दिलेल्या सत्तास्थापनेच्या निमंत्रणाविषयी काँग्रेस आणि जेडीएसच्या याचिकेवर अद्याप निर्णय दिलेला नाही. निमंत्रण देण्याआधी राज्यपालांना दिलेली सत्तास्थापनेचा दावा करणारी दोन पत्र सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालायनं येडियुरप्पा आणि भाजपच्या वकीलांना दिले आहेत. या संदर्भातील पुढची सुनावणी शुक्रवारी होणार आहे.

No comments:

Post a Comment