तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 16 May 2018

विरोधी पक्षांना एकत्र आणत निवडणूक आयोगाला घेरणार-शरद पवार

  बाळू राऊत
मुंबई :कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीनंतर 'ईव्हीएम' हटवण्याबाबत भाजप सोडून इतर पक्षांना एकत्र आणून निवडणूक आयोगाकडे आग्रह धरला जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे सांगितले.
जगात जिथे जिथे ईव्हीएमचा वापर होत होता त्यांनी मतदान यंत्रांचा वापर बंद केला आहे असे नमूद करून ते म्हणाले की, ईव्हीएममध्ये 'गडबड' होते असा दाट संशय लोकांच्या मनात आहे. लोकशाहीत तो संशय दूर करून जनतेचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास अढळ राखला पाहिजे.
कर्नाटकात काँग्रेसच पुन्हा सत्तेवर येईल असे आता तरी दिसतेय, असे पवार यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. देशातील निवडणुकीचा ट्रेंड पाहिला तर तो आता बदलाला अनुकूल आहे. पण म्हणून लगेचच कोणाला किती जागा मिळतील या निष्कर्षाप्रत येणे म्हणजे 'बाजारात तुरी आणि कोण कुणाला मारी' असे होईल, असा टोला पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या दावेदारीच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना लगावला.
पंतप्रधान ही एक इन्स्टिटय़ूशन आहे. त्या पदाची प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे. पण कुत्रा काय, खेचर काय अशी भाषा वापरली जात आहे. पदाच्या प्रतिष्ठेचे महत्त्व यांना दिसत नाही अशी टीका त्यांनी केली.
२०१४ च्या निवडणुकीवेळी सत्ता येताच पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेऊ असे आश्वासन पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी दिले होते त्याला चार वर्षे होऊन गेली अशा शब्दांत त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.

No comments:

Post a Comment