तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 31 May 2018

श्रीनिवास वनगांसाठी आमचे दरवाजे कायम खुले – देवेंद्र फडणवीस


श्रीनिवास वनगांसाठी आमचे दरवाजे कायम खुले आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ज्याप्रकारे निवडणूक झाली ते क्लेषदायी होतं असंही म्हटलं. मित्रपक्षाने आमच्याच नेताच्या मुलाला आमच्याविरोधात उभं केलं. यामुळे आमच्यात थोडा कडवटपणा निर्माण झाला होता. भविष्यात असं होऊ नये यासाठी प्रयत्न असेल असं त्यांनी सांगितलं. ईव्हीएम मध्ये झालेल्या बिघाडाची निवडणूक आयोगाने दखल घेतली पाहिजे अशी मागणी यावेळी त्यांनी केली. आमचा सुशिक्षत मतदार सकाळी पहिल्यांदा मतदानासाठी जातो. पण ईव्हीएम बंद असल्यावर परतलेला तो पुन्हा येत नाही त्यामुळे आमचं नुकसान होतं असं त्यांनी सांगितलं. ईव्हीएम बिघाडाचा भाजपाला मोठ्या प्रमाणात फटका बसला असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे काही जण आम्हीच ईव्हीएमची निर्मिती केल्याप्रमाणे टीका करतात अशी खंत त्यांनी व्यक्त केली. निवडणूक आयोग स्वतंत्र आहे असं त्यांनी सांगितलं. भंडारा गोंदिया मध्ये झालेल्या पराभवाच्या कारणांवर आम्ही चर्चा करु. २०१९ मध्ये या जागा आम्ही मोठ्या फरकाने जिंकू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.युतीसाठी शिवसेनेने पुढाकार घ्यावा. आम्ही चर्चेसाठी कधीच नकार दिलेला नाही, चर्चेसाठी आम्ही नेहमीच तयार आहोत असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. एकत्र लढणं आमच्या दोन्ही पक्षांच्या हिताचं आहे. समविचारी पक्ष एकमेकांविरोधात लढल्यानंतर नुकसान हे होणारच. त्यामुळे एकत्र निवडणूक लढण्याचा प्रयत्न असतो असं त्यांनी सांगितलं. शिवसेना दुसऱ्या कोणत्या पक्षासोबत जाईल असं वाटत नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

No comments:

Post a comment