तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 18 May 2018

औरंगाबादची दंगल पूर्वनियोजित, प्राथमिक अहवाल.


दंगल पूर्वनियोजित असल्याचा पोलिसांच्या प्राथमिक अहवालात पुढे आला आहे, अशी सूत्रांनी माहिती दिलीय. शहरावर वर्चस्व ठेवण्यासाठी दोन राजकीय पक्षात चढाओढ सुरु होती आणि त्यातून नियोजनबद्ध पद्धतीने सगळं घडलं असल्याचं पोलिसांच्या एसआयटीने केलेल्या तपासात पुढं आलं असल्याची सूत्रांची माहिती आहे.ही दंगल पूर्वनियोजित असल्याची अनेक कारणं पोलिसांकडे आहेत. या माहितीच्या आधारे तपास सुरू असल्याची पोलीस सांगतायत.  यादंगल प्रकरणात आतापर्यंत शिवसेनेच्या दोन तर एम आय एम च्या एका नेत्याला अटक करण्यात आली आहे. तर दोन्ही पक्षाच्या १० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. आज या दोन्ही पक्षाचा काही मोठ्या नेत्याने सुद्धा अटक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दंगली मागे नेमके कोण होते, तेही स्पष्ट होणार आहे.

No comments:

Post a Comment