तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 14 May 2018

गेवराईच्या अर्बन बँकेत छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी

सुभाष मुळे...
---------------
गेवराई, दि. 15 __ येथील गेवराई अर्बन निधी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह या बँके मध्ये स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
      याप्रसंगी बॅंकेचे चेअरमन गणेश धुमाळ उपस्थित होते. ते म्हणाले की छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार सर्वांनी घेतले पाहिजे. त्यांनी स्वराज्यात प्रशासन कसे करावे, आई वडिलांचा आदर्श कसा घ्यावे, महिलांचा सन्मान करून त्यांना प्रथम आपल्या राज्यात अधिकार देणारे ते पहिले राजे होते. त्यांनी नायिकाभेद,नकशिका, सातसतक हिंदीत व बुधभूषण संस्कृत मध्ये लिहिले ते ज्ञानपंडित होते. सर्व समाजाला सोबत घेउन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या विचारांचं सुराज्य निर्माण केले असे सांगितले. यावेळी संभाजी बिग्रेड जालना चे सचिव सोमेश घारे म्हणाले की, संभाजी राजे वयाच्या पंधराव्या वर्षी दहा हजार सैन्य घेऊन गुजरात मोहीम यशस्वी करून आले. वयाच्या सोळाव्या वर्षी ईस्ट कंपनी शिष्ट मंडळाबरोबर इंग्रजीतून चर्चा केली. संभाजीराजे बुद्धि प्रामाण्यवादी होते. त्यांचा विश्वास स्कर्तृत्वावर होता. संभाजीराजे बुधभुषण ग्रंथात म्हणतात" की, जे प्रयत्नवादी असतात ते मर्द असतात आणि जे दैववादी असतात ते नामर्द असतात". निद्रेचे चार तास सोडले तर सतत वीस तास संभाजीराजे स्वराज्य रक्षणासाठी लढले. एका वेळेस त्यांनी मोघल, आदिलशहा, पोर्तुगीज, इंग्रज, सिद्धी इत्यादी शत्रूंशी लढा दिला.
     संभाजीराजे निर्व्यसनी आणि नीतिमान राजे होते. यावेळी बँकेचे चेअरमन गणेश धुमाळ, संभाजी ब्रिगेड जालना जिल्हा सचिव सोमेश घारे, अनिल मोटे, विकास बांगर, अर्जुन चाळक, अशोक चौकशी, बाळासाहेब बर्गे आणि बँक कर्मचारी उपस्थित होते.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
-----------------------------------
--- जाहिरात व बातमी करिता संपर्क ----
------------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment