तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 14 May 2018

मुंबईत रेल्वेच्या धक्क्याने चार जणांचा मृत्यु .


बोरीवली ते कांदीवली स्टेशन दरम्यान रेल्वे रूळ ओलांडताना एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. अपघातात मृत्यू झालेले चौघेही कणकवलीहून मुंबईतील घरी परतत होते. त्यावेळी रेल्वे रूळ ओलांडताना ट्रेनची धडक लागून चौघांचा मृत्यू झाला. सागर संपत चव्हाण (वय 23 वर्ष), साईप्रसाद मनोहर चव्हाण (वय 17 वर्ष), मनोज दीपक चव्हाण (वय 17 वर्ष), दत्तप्रसाद मनोहर चव्हाण (वय 20 वर्ष)  अशी मृतांची नावं आहेत. या चौघांपैकी सागर हा कांदिवलीचा राहणारा होता तर इतर तिघं कणकवलीचे रहिवासी होते. सोमवारी सकाळी सागरच्या घरी जाण्यासाठी सगळे निघाले होते. त्यावेळी बोरिवलीला ट्रेनने जाताना पोईसर- कांदिवली येथे सिग्नला लोकल थांबली. यावेळी तिघांची ट्रेनमधून उड्या मारल्या. ट्रॅक ओलांडत असताना चर्चगेटहून येणाऱ्या गाडीची धडक या चौघांना बसल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

No comments:

Post a Comment