तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 16 May 2018

दरोडा फसला, पाच दरोडेखोर भावांसह एक अटकेत.

नगर-दौंड मार्गावरील प्रवाशांना लुटण्यासाठी रस्त्यालगत लपून बसलेल्या सहा दरोडेखोरांना नगर पोलिसांनी अटक केली आहे. या सहा जणांपैकी पाच जण सख्खे भाऊ असून त्यांचे वडील देखील सऱ्हाईत गुन्हेगार आहेत.एका गुन्ह्याचा तपास करत असताना नगर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना दरोड्याची माहिती मिळाली. कुक्या उर्फ सुलदास उबऱ्या काळे या कुख्यात दरोडेखोराने त्याच्या साथीदारांसह नगर-दौंड मार्गावर प्रवाशांना लुटण्याची योजना आखल्याचे खबऱ्यांनी पोलिसांना कळवले. त्या माहितीच्या आधारे जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींना पकडण्याची योजना आखण्यात आली. त्यानुसार रात्री ११. ४५ वाजता पोलिसांनी सापळा रचून त्या सर्व दरोडेखोरांना अटक केली.सगड्या उबऱ्या काळे, कुक्या उर्फ सुलदास काळे, अक्षय काळे, कोक्या उर्फ कोलदास काळे, मिथून काळे अशी त्या पाच भावांची नावे असून दत्ता उर्फ दत्तात्रय अरुण भोसले हा देखील त्यांच्यासोबत दरोडा घालणार होता. पोलिसांनी या सहा जणांना अटक केल्यानंतर त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून चाकू, सुऱ्यासारखी हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. या सर्व आरोपींवर बेलवंडी, श्रीगोंदा, सुपा, पारनेर, पुणे येथे खून, दरोडा, बलात्कार, घरफोडी सारखे गुन्हे दाखल आहेत.

No comments:

Post a Comment