तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 15 May 2018

छत्रपती संभाजी महाराज जयंती निमीत्त झरी येथे विविध कार्यक्रम संपन्न

प्रतिनिधी
झरी:-सोमवार १४ मे रोजी संध्याकाळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३६१ व्या जयंती निमित्त ३६१ मशालीची फेरी बाजार मैदान येथुन निघुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या पर्यंत व परत गणपती मंदीर या मार्गे बाजार मैदान या ठिकाणा पर्येत काढण्यात आली.
या प्रसंगी कलावंताचा सत्काल 'ईस्तु' ग्रुपच्या वतीने करण्यात आला. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमीत्य अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यांनी झरी गावात शुन्यातुन प्रगती साधली अपार कष्टाच्या जोरावर कलेच्या आधारावर गावाचे नाव मोठे केले अशा कलावंताचा सत्कार “ शिवशंभु झरी रत्न पुरस्कार ” देवुन केला सदर पुरस्काराचे स्वरुप शाल श्रीफळ आणी छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा असे होते.
सदरील कार्यक्रमांचे अध्यक्ष माजी सरपंच गजाननराव देशमुख  तर उदघाटक तालुका कृषी अधिकारी प्रभाकर बनसावडे सर, तलाठी शेख अनवर होते. प्रमुख पाहुने म्हणुन श्री.के.एच.जाधव, डाॅ.भिक्कुदास लाटे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री.ब्रम्हानंद सावंत, उपसरपंच कैलास रगडे, तर ग्रामपंचायत सदस्य अभिजीत परिहार, संदिप जाधव, ओंकार सावंत, तसेच गावचे प्रतिष्ठीत नागरीक महेश मठपती, बाळासाहेब जगाडे, कुलदिप रघुवंशी, अतिख इनामदार, दत्तराव जगाडे, मुस्सा कुरेशी अदि मान्यवरांची उपस्थीती होती.
सदरील कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन व जिजामाता, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमा पुजनाने करण्यात आली.
सदरील कार्यक्रमात शिवशंभु झरी रत्न पुरस्कार आदर्श पत्रकारीता अनिल जोशी, आदर्श शेतकरी गंगा तात्या जगाडे, आदर्श शिक्षक जयराज परिहार सर, आदर्श लेखक अशोकराव सावंत, आदर्श समाजसुधारक डाँ.भिक्कुदास लाटे, आदर्श व्यापारी संदिप काळंखे यांच्यासह विविध क्षेत्रातील 18 मान्यवरांना प्रदान करण्यात आला. यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जिवन चरित्रावर शिवव्याख्याते महादेव लिंगे सर यांच्या जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम झाला.
सदरील कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बाळकृष्ण शिंदे, सखाराम नन्नवरे तर आभार प्रदर्शन बाळकृष्ण शिंदे यांनी केले. सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी ईस्तु बाँईजच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. ईस्तु बाईज ग्रुपच्यावतीने घेतलेल्या अनोख्या कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे.

No comments:

Post a Comment