तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 15 May 2018

केम येथील जुगार अड्डयावर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचा छापा

मुद्देमालासह 8 आरोपींना घेतले ताब्यात
----------------------------------------
   सोलापूर:-मा पोलीस अधीक्षक वीरेश प्रभु यांचेकडे आलेल्या तक्रारीवरून व त्यांच्या आदेशान्वये अवैध धंद्यावर कारवाई करणेकामी करमाळा पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना दि 15-05-2018 रोजी दुपारी 1-00 वा चे सुमारास मौजे केम गावातील पठाण गल्लीतील भोसले यांच्या जुन्या वाड्यात नितिन गोरख तळेकर व अशोक नवनाथ तळेकर हे चालवत असलेल्या मन्ना नावाच्या जुगार अड्डयावर छापा टाकुन आरोपी 1) नितीन गोरख तळेकर, 2) अशोक नवनाथ तळेकर, 3) फिरोज शमशोद्दीन मुलाणी, 4) शबीर चाँद पठाण, 5) तानाजी जगन्नाथ पोकळे, 6) सुधिर विजय तळेकर सर्व रा केम ता करमाळा, 7) नितीन ज्ञानदेव तोरसकर, 8) बापू शाहूराव अंधारे दोघे रा वडशिवणे ता करमाळा यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून त्यांचे ताब्यातील जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, वाहने असा एकूण 1,34,830/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सर्व 8 आरोपी विरूद्ध करमाळा पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक  वीरेश प्रभु सर यांच्या आदेशान्वये विशेष टीम मधील सपोनि संदीप धांडे, पो.ना अमृत खेडकर, पोकाॅ सचिन कांबळे, गणेश शिंदे, अनुप दळवी, सुरेश लामजने, अभिजीत ठाणेकर, बाळराजे घाडगे, महादेव लोंढे यांच्या टिमने हे काम केले आहे.

No comments:

Post a Comment