तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 14 May 2018

एसआरपीएफच्या निलंबित २० जवानांच्या उत्तरपत्रिका जप्त.


हिंगोली:- येथील राज्य राखीव पोलीस दल गट (एसआरपीएफ) क्रमांक १२च्या पोलीस भरतीमध्ये लेखी परीक्षेत गुण वाढवून घेत नोकरी मिळवणाऱ्या निलंबित २० जवानांच्या उत्तरपत्रिका तसेच इतर कागदपत्रे आज पोलिसांनी जप्त केली. एसआरपीएफ कार्यालयात जावून हिंगोली शहरचे पोलीस उपाधीक्षक राहुल मदने व पोलीस निरीक्षक अशोक मैराळ चौकशी व तपास केला. नांदेड प्रमाणेच हिंगोली एसआरपीएफ मध्येही पोलीस भरती घोटाळा झाल्याचे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या चौकशीत समोर आले आहे. दरम्यान, ११ मे रोजी रात्री हिंगोली एसआरपी दलाचे तत्कालीन सहायक समादेशक जयराम फुपाटे, चालक नामदेव ढाकने, एसएसजी सॉफ्टवेयर कंपनीचे ऑपरेटर शिरीष अवधूत, पोलीस कर्मचारी शेख महबूब शेख आगा यांच्यासह गुण वाढवून नोकरी मिळवणाऱ्या २० जणांविरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसआरपीएफच्या २०१३च्या भरतीमध्ये ४, २०१४ मध्ये १० तर २०१७ मध्ये ६ उमेदवारांचे गुण वाढवून त्यांना एसआरपीएफची नोकरी दिल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर समादेशक योगेशकुमार यांनी २० जवानांना निलंबित केलेआहे. घोटाळा करून पोलीस झालेले गोविंद बाबूराव ढाकणे, निलेश बाबूराव अंभोरे, सुरेशविश्वनाथ चव्हाण, युसूफ फकिर शेख, मुनाफ रफिक शेख, संदीप केशव जुमडे, उद्धव शिवराम धोतरे, अमोल विनोद जावळे, हरिभाऊ लक्ष्मण दुभळकर, विश्वनाथ सदाशिव दळवे, सतीश विलासराव अंभोरे, सुभाष दशरथ रिठाड, किशन रामभाऊ शिंदे, गोरखनाथ धोंडूजी कोकाटे, अमोल विठ्ठल मांदळे, भगवान सुखदेव बोरुडे, बालकृष्ण नामदेव वाघमारे, महादेव रामचंद्र पोवार, विठ्ठल संतोष खरात, विकास फुलचंद डोळे या २० जनांच्या उत्तरपत्रिका पोलिसांनी जप्त करत ताब्यात घेतल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणी अद्याप एकही आरोपीला अटक झाली नाही

No comments:

Post a Comment