तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 16 May 2018

पालम येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

अरुणा शर्मा

पालम :- येथील
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून अरुणोदय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, धनंजय मित्र मंडळ, ममता विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 20 में रोजी  सकाळी 9 ते 2 वाजे पर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
राष्ट्रमाता आईल्याबाई होळकर यांच्या 293 व्या जयंतीनिमित्त अरुणोदय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, धनजंय मित्र मंडळ, ममता विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन  करण्यात येणार असून या शिबिराचे उदघाटक एस.बी.आय. बँकेचे  शाखाधिकारी श्री मृत्यूंजय तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य आर.के. सिरसाागर, सुर्यकांत माखणीकर विशेष उपस्थिती म्हणून पञकार माधवराव गायकवाड, मोतीराम शिंदे, धोडिराम कळंबे, लक्ष्मण दुधाटे, शांतीलाल शर्मा, माऱोती नायकवडे, न्यानोबा कराळे, सोपान कुरे आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी तब्बल अकरा वेळा रक्तदान करणारे तरुण युवक आमोल रोकडे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या शिबिरास तालुक्यातील युवकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून रक्तदान करावे. असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष देवानंद हत्तीआबीरे, गजानन घोरपडे, राम कदम, अनिल पौळ,  आनंद साखला, अजय शिंदे, निळकंट लांडे आदींनी केले आहे.

No comments:

Post a Comment