तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 15 May 2018

आयसीसी अध्यक्षपदी पुन्हा शशांक मनोहर.


हिंदुस्थानच्या शशांक मनोहर यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली आहे. मनोहर यांची निवड बिनविरोध झाली आहे. शशांक मनोहर यांनी २०१६ मध्ये पहिल्यांदा आयसीसीच्या अध्यक्षपदाचा कारभार स्वतंत्रपणे सांभाळला होता.अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शशांक मनोहर म्हणाले की, ‘आयसीसीच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड होणे हा माझा बहुमानच आहे. आयसीसीच्या सदस्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि पाठिंबा दिला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. येत्या दोन वर्षांत आम्ही सारे एकजुटीने क्रिकेटचा अजून चांगला विकास कसा होईल, याबाबत प्रयत्न करु.’

No comments:

Post a Comment