तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Friday, 18 May 2018

पुणे महानगर क्षेत्राच्या विकासासाठी महाराष्ट्र-सिंगापूर जॉईंट कमिटीची बैठकीत निर्णय

बाळू राऊत
मुंबई.दि.१८
महाराष्ट्र-सिंगापूर जॉईंट कमिटीची (एमएसजेसी)
पहिली बैठक आज मुंबईत मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि सिंगापूरचे व्यापार व्यवहार मंत्री श्री एस. ईश्वरन यांच्या उपस्थितीत मुंबई येथे झाली. मंत्री श्री गिरिश बापट आणि महाराष्ट्र, सिंगापूरचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
पुणे महानगर क्षेत्राचा कन्सेप्ट प्लान तसेच ग्रोथ सेंटर्सच्या विकासाच्या दृष्टीने सविस्तर लँडयुज आराखडा, लॉजिस्टिक सेवा इत्यादीसाठी एन्टरप्राईज सिंगापूर यांच्यासोबत सामंजस्य करारावर यावेळी स्वाक्षरी करण्यात आली. पुणे महानगर क्षेत्राच्या पुढच्या 50 वर्षांच्या नियोजनाचा आराखडा या माध्यमातून तयार केला जाणार असून, कन्सेप्ट प्लान 6 महिन्यात तर लँडयुज प्लान 10 महिन्यात तयार केला जाणार आहे. शहरांचा पायाभूत विकास, नागरी उड्डयण आणि औद्योगिक विकासाच्या विविध मुद्यांवर सुद्धा यावेळी चर्चा करण्यात आली. पुरंदर येथील विमानतळाच्या विकासासाठी चांगी एअरपोर्ट इंटरनॅशनलसोबत एक करार सुद्धा यावेळी करण्यात आला.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज या जॉईंट कमिटीच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि सिंगापूरच्या संबंधांमध्ये एक नवा अध्याय जोडला गेला आहे. आपण अनेक प्रकल्प निश्चित केले आहेत. विकास हा शाश्वत असावा, असा आमचा नेहमीच प्रयत्न राहत आला आहे आणि यासाठी सिंगापूर हा आमचा उत्तम भागिदार असेल. पुणे हे आमचे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राचे, ऑटोमोबाईल क्षेत्राचे हब आहे. महाराष्ट्र सरकारकडून या विकासाच्या प्रक्रियेत अडचणीमुक्त वातावरणाची ग्वाही मी आपणाला देतो. याशिवाय, प्रत्येक बेघराला परवडणार्‍या किंमतीत घरे देण्याच्या दृष्टीने आपले सरकार काम करते आहे. याही क्षेत्रात सिंगापूर सरकारकडून आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे.

No comments:

Post a Comment