तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 18 May 2018

गेवराईतील गोदावरी मल्टीस्टेटच्या कॉर्पोरट ऑफिसचे थाटात उदघाटन


सुभाष मुळे..
--------------
गेवराई, दि. 18 __ बँकिंग क्षेञात उत्कृष्ट कार्य करीत जनतेच्या मनात विश्वास निर्माण करणारी सहकार क्षेञातील गोदावरी मल्टीस्टेटच्या कॉर्पोरट ऑफिसचे उदघाटन गेवराई येथील चिंतेश्वर संस्थानचे मठाधिपती ह.भ.प. दिलीप महाराज घोगे यांच्या हस्ते संपन्न झाले.
     याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पैठणचे युवा उद्योजक भाऊ पाटील, वरदराज ऑटो, साईनाथ परभणे, संजय तळतकर, मेघारे, बाळासाहेब दहिफळे, बापूसाहेब गुंदेकर, अमोल आतकरे आदी उपस्थित होते. संस्थापक प्रभाकर पराड यांनी प्रस्ताविक करताना संस्थाच्या कार्याचा आढावा मांडला व संस्था, छोटे व्यापारी, मोठे व्यापारी, नोकरदार व शेतकरी यांना कर्ज पुरवठा करून सामान्य लोकांचे संसार उभे करण्याचे काम करते. सुरक्षित कर्ज वाटप करून व ठेवीदार यांना वेळेत पैसा परत करते. यामुळे ठेवीदारचा विश्वास वाढत आहे. यामुळे गोदावरी मल्टीस्टेटचा ग्राहक वर्ग वाढत चालला आहे. त्यामुळे ग्राहकांना अधिक उत्तम सेवा व डिजीटल व्यवहार करता यावा यासाठी कॉर्पोरट ऑफिसची सुरूवात करत आहे. याप्रसंगी शेवटी ह.भ.प. दिलीप घोगे महाराज यांचे मार्गदर्शक भाषण झाले. त्यांनी गेवराई शहरातील नागरिकांना उत्तम सेवा, होतकरू व गरजू लोकांना कर्ज पुरवठा करून व्यवसाय करण्यासाठी गोदावरी मल्टीस्टेटने हातभार लावावा तसेच या संचालक मंडळाने उत्तम कार्य करून सहकार क्षेञात एक आदर्श संस्था असा दबदबा निर्माण करावा. पुढील कार्यासाठी आर्शीवाद दिले. शेवटी आभार मधूकर वैण्णव यांनी मानले.
     या प्रसंगी शेख अनिस, प्रविण पंडित, गणेश शहाणे, सिंकदर शेख, चंद्रकांत शिंदे, मस्के सर, शिवाजीराव नावडे, घाडगे पाटील, दादा खांडेकर, प्रतिक नागरे, बालाप्रसाद लड्डा, भागवत जाधव, उबाळे सर बहूसंख्य शिक्षक, ग्रांहक, ठेवीदार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्यवस्थापक रामनारायण मोटे, वाघ सर, रामेश्वर दारूणकर, नितीन पराड, सुदर्शन निवारे, खडके, वैजीनाथ मुळे, गजानन पाटील, अमोल खरात, पवन पांचाळ, महादेव पराड, दिपक पंडित, जोशी आदींनी यशस्वी केला.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
-----------------------------------
--- जाहिरात व बातमी करिता संपर्क ----
------------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment