तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 13 May 2018

छात्रभारती कडून मुंबई विद्यापीठाला निवेदन लवकरात लवकर विधी शाखेचे निकाल जाहीर करावेत

बाळू राऊत 
मुंबई:-छात्रभारती कडून मुंबई विद्यापीठाला निवेदन लवकरात लवकर विधी शाखेचे निकाल जाहीर करावेत अन्यथा छात्रभारती विद्यार्थी संघटना विद्यापीठ प्रशासन विरोधात तीव्र आंदोलन करेल असा इशारा छात्रभारतीचे अध्यक्ष सचिन बनसोडे यांनी दिला.
विधीशाखेची पहिल्या सत्राची, दुसऱ्या सत्राची व तिसऱ्या सत्राची परीक्षा संपवून चार महिने उलटून गेले असून अद्यापपर्यंत निकाल जाहीर केले नाहीत .आणि जाहीर करण्याची परिस्थिती सुधा दिसत नाही .त्यामुळे विधी शाखेचे सर्व विद्यार्थी संभ्रर्मात आहेत.विधीशाखेची दोन , चार,  सहा , यांची परीक्षा आठवडयावर आली आहे.अद्याप मागील परीक्षेचे निकाल लागले नसल्यामुळे विद्यार्थी गोंधळात आहेत .
परीक्षा संपवून ४५ दिवसात निकाल मिळवा हा विद्यार्थीचा आधिकार आहे .मात्र विद्यापीठाकडून विद्यार्थीना रखवडेले जात आहे .विधीशाखेची सेमिस्टर एक, तीन , पाच , निकाल जाहीर होत नाहींत , तोपर्यत दोन , चार , सहा च्या परीक्षा पुढे ढकलाव्यात जेणेकरून विद्यार्थ्याना परीक्षेच्या अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळवा विधी व  ईतर शाखांचे निकाल विद्यापीठाने तात्काळ जाहीर करावा जाहीर झालेल्या निकालांच्या पुनर्मूल्यांकानासाठी न विद्यार्थ्याना पुरेसा वेळ  मिळावी आणि वेळ वाढवताना कोणत्याही प्रकारची फी वाढ करू नाही .विद्यापीठ प्रशासनाने दक्षता घ्यावी. अन्यथा छात्रभारती विद्यार्थी संघटना विद्यापीठ प्रशासन विरोधात तीव्र आंदोलन करेल असा इशारा छात्रभारतीचे अध्यक्ष सचिन बनसोडे यांनी दिला.

No comments:

Post a Comment