तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 16 May 2018

शेतकरी संघर्ष समितीचा पाथरीत रास्ता रोको

प्रतिनिधी
पाथरी :-२०१७ च्या खरीप हंगामात  रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने पीकविमा प्रकरणी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत विमा कंपनीवर कारवाई करण्यात यावी यासाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आज जिल्ह्यात विविध ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला.जिल्ह्यातील पाथरी येथे भाकप नेते राजन क्षीरसागर व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष माणिक कदम यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खरीप हंगाम 2017 मध्ये रिलायन्स विमा कंपनीने केवळ सोयाबिनसाठी 2 लाख 79 हजार शेतकऱ्यांकडून पीक विम्याची रक्कम जमा केली. तसेच शासन कडून अनुदानापोटी असे मिळून जवळपास 180 कोटी रुपये हफ्ता जमा केला. परंतु शासनाची पीक कापणी आकडेवारी मान्य न करता जिल्ह्यातील पात्र 2 लाख 30 हजार शेतकऱ्यांना विमा नाकारला. त्या मुळे अनेक शेतकऱ्यांनी विमा कंपनी विरोधात पोलिसात तक्रारी दाखल केले आहेत. त्या मुळे विमा कंपनीवर तात्काळ गुन्हा दाखल करावा. आणि पात्र शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळावी अशी मागणी आंदोलक करत आहेत. या शिवाय बोन्ड अळीच्या नुकसानी पोटी हेक्टरी 40 हजार रुपये द्यावे, दुष्काळ जाहीर करण्यासाठीचे निकष 2016 साली बदलण्यात आले ते रद्द करावे, नवीन कर्जवाटप तात्काळ सुरू करावे, रानटी जनावरांकडून झालेल्या शेतीची नुकसान भरपाई देऊन या रानटी जनावरांचा बंदोबस्त करावा आदी मागण्याही आंदोलकांनी केल्या आहेत. पाथरी शिवाय झिरोफाटा, पेडगाव, मानवत रोड, झरी, दैठणा, परभणी, पालम, गंगाखेड आदी ठिकाणीही रास्ता रोको आंदोलन झाल्याचे वृत्त आहे. 

No comments:

Post a Comment