तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Sunday, 13 May 2018

२२ मे रोजी धनगर समाजाचा मंत्रालयावर मोर्चा

सोलापूर - इतिहासात कोणत्या समाजाची एवढी फसवणूक झाली नसेल इतकी मोठी फसवणूक फडणवीस सरकारकडून धनगर समाजाची झाल्याने समाजापुढे आंदोलनाशिवाय पर्याय नाही. येत्या 22 मे रोजी मंत्रालयावर मोर्चा काढून अकरा हजारजण ढोलगर्जनेने सरकारला जागे  करणार असल्याची माहिती माजी आमदार तथा धनगर समाज उन्नती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

संपूर्ण राज्यातून जवळपास 11 हजारजण ढोलगर्जना करणार आहेत. यासाठी सर्व राज्यांतून प्रकाश शेंडगे दौरा करीत आहेत. त्याचाच भाग म्हणून ते सोलापूर दौर्‍यावर आले होते. त्यावेळी त्यांनी आंदोलनाची विस्तृत माहिती दिली.

प्रकाश शेंडगे म्हणाले, 1956 साली कालेलकर कमिशनने सर्व्हेक्षण करुन धनगर समाज हा अतिशय मागासलेपण असल्याचे सांगून एसटीचे सवलती देण्याची शिफारस केली. तत्कालीन घटना आयोगाने केंद्राकडे शिफारस केली. मात्र, यादी प्रसिद्ध करीत असताना धनगर, धनगड असा घोळ  झाला. दोन्ही शब्दांचा अर्थ एकच असल्याचे असंख्य पुरावे विधानसभा, विधानपरषिदेत दिले. पण याची फारशी  कोणी दखल घेतली नाही.

2014 च्या निवडणुकीपूर्वी पंढरपूर ते बारामती अशी पदयात्रा काढून बारामतीत आंदोलन केले, नऊ दिवस उपोषण केले. त्यावेळी   आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा सत्तेवर आल्यावर लगेच पहिल्या कॅबिनेटमध्ये समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करण्याचा निर्णय घेऊ, असे आश्‍वासन दिले. मात्र भाजप सत्तेवर येऊन सव्वा दोनशे कॅबिनेट बैठका झाल्या; मात्र एकदाही ‘ध’ चा उच्चार केला नसल्याचे प्रकाश शेंडगे यांनी सांगत  फडणवीस सरकारने समाजाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

1956 पासून सर्व राजकीय पक्षांनी समाजाचा नुसता वापर करुन घेतला आहे. त्यामुळे याचा जाब विचारण्यासाठी मंत्रालयावर मोर्चा काढला जाणार आहे. आतापर्यंत 1356 ढोलगर्जनाचा विक्रम होता. मात्र आता 22 मे ला अकरा हजारजण ढोलगर्जना करून समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकारला भाग पाडणार असून तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नसल्याचे शेंडगे यांनी सांगितले.

या मोर्चात समाजाचे सत्तेतील, विरोधकातील सर्व नेते सामील होणार असल्याचे सांगत देव-देवतांचा उद्घोष करीत हे आमचे पारंपरिक ढोलगर्जनाचे आंदोलन केले जाणार आहे. यात सर्व स्तरांतील व्यक्तींसह समाजाचे मठाधिपतीही सामील होणार आहेत. समाजाला न्याय मिळाला नाही तर येत्या निवडणुकीत सरकारला सत्तेवरुन खाली खेचणार असल्याचा इशाराही शेंडगे यांनी दिला.

यावेळी रेणुकाताई शेंडगे,  विलास पाटील, डॉ. अभिमन्यू टकले, मिनिषा वाघमोडे, राधाकृष्ण पाटील मनिषा माने, सूरज देवकते, अशोक ढोणे, शेखर बंगाळे, डी.डी. पांढरे, बाळासाहेब बंडगर यांची उपस्थिती होती.

फसवणूक करण्याचा एककलमी कार्यक्रम

सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकरांचे नाव देण्यासाठी 2013 मध्ये पहिले आंदोलन केले. त्यावेळी सर्व लोकप्रतिनिधींनी पाठिंबा दिला. सर्वांनी पाठिंबा दिल्याने मुख्यमंत्र्यांनी नाव देण्याचे जाहीर केले. मात्र नंतर यावर समिती नेमून विषय प्रलंबित ठेवण्याचे काम होत आहे, तर दुसरीकडे त्यांचेच नेते तावडे तेढ निर्माण होण्याची भाषा करतात. यातून समाजाची फसवणूक करण्याचा एककलमी कार्यक्रम चालू असल्याचे शेंडगे यांनी आरोप केला.

भुजबळ परत राष्ट्रवादीत होणार सक्रिय

छगन भुजबळ हे बहुजनाचे नेते आहेत. दोन वर्षे जेलमध्ये गेले म्हणून काही फरक पडत नाही. चळवळीतील नेत्यांनी जेलमध्ये जाण्याची तयारीच  ठेवूनच कार्य सुरू केलेले असते. ते लवकरच राष्ट्रवादी पक्षात सक्रिय होतील, याबाबत कोणी शंका घेऊ नये, असे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment