तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 15 May 2018

झुंजार नारी मंचच्या प्रशिक्षण शिबिरास गेवराईतून सहभाग

सुभाष मुळे....
----------
गेवराई, दि. 15 __ सचिव पदावर कार्यरत असलेल्या सौ. आशा वरपे यांच्या मार्गदर्शनाखाली झुंजार नारी मंच च्या वतिने आयोजित करण्यात आलेल्या मोफत एकदिवसीय सौंदर्य प्रशिक्षण शिबिरात गेवराईतून महीलांचा मोठा सहभाग मिळाला.
       गेवराई येथील झुंजार नारी मंच च्या वतिने तालुक्यातील महीलांसाठी रुपनिखार ब्यूटी पार्लर याठिकाणी मोफत एकदिवसीय सौंदर्य प्रशिक्षण मंगळवार, दि. 15 मे 2018 रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी झुंजार नारी मंच च्या तालुकाध्यक्ष अनुसया मुनेश्वर, उपाध्यक्षा रामकंवर देवकर यांनी परीश्रम घेऊन प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. यात साडी ड्रेपिंग, वैयक्तिक शृंगार, हेअर स्टाईल, मेकअप आदींसह विविध शैलींचे दिमाखदार प्रात्यक्षिकासह रुप सजावटीचे प्रशिक्षण देण्यात आले.
      याप्रसंगी गेवराई येथील माजी नगरसेविका अश्विनी करांडे, छायाताई पिसाळ, चंदना पवार, रुपाली मोटे प्रिती शेंडेकर, वैष्णवी जोशी, मनिषा खाडे, ज्योती हिंगे, उषा पवार, आकांक्षा देवकर, शिल्पा मुनेश्वर आदींसह असंख्य महीला व मुलींनी सहभाग नोंदविला.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
-----------------------------------
--- जाहिरात व बातमी करिता संपर्क ----
------------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment