तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Monday, 14 May 2018

●|| हे विश्वची माझे घर ||●

भारतीय संस्कृतीत कुटुंब व्यवस्थेला अतिशय महत्त्वाच स्थान आहे. ज्ञानेश्वरीचा सार घेऊन विश्वातील समस्त जीवांच्या हिताचे पसायदान मागणा-या संतश्रेष्ठ श्री.ज्ञानेश्वरांनी ‘हे विश्वची माझे घर’ मानून सगळ्या विश्वालाच एक कुटुंब मानले. अगदी रामायण महाभारताच्या काळापासून पाहिले तर कुटुंब व्यवस्थेला अधिकच महत्त्वाच स्थान आहे. मुळात कुटुंब हि संकल्पना कुण्या महान थोरान मांडली असावी ज्याच्यामुळे समृद्ध आश्या आमच्या भारतीय संस्कृतीच दर्शन घडतं. खरं तर आई-वडील, आजी-आजोबा, काका-काकू,बहिण-भाऊ हि रक्तातली नाती म्हणजेच कुटुंब होय असे नाही काळानुसार कुटुंबाची संकल्पना आणि व्याख्याही बदलत गेली. एकत्रित कुटुंबातून संयुक्त कुटुंबेही अस्तित्त्वात आली. मात्र, रक्ताच्या नात्यांपलिकडेही प्रेम आणि मायेने जोडलेल्या नात्यातील मानवतेच्या कुटुंबात राहणा-यांची संख्याही कमी नाही. या अशा कुटुंबातही प्रत्येक सदस्याची त्याच आपुलकीने तशीच काळजी घेतली जाते. रक्ताच्या नात्यांमधील कुटुंबाचा विचार करताना अशा कुटुंबांचेही महत्त्व कमी होत नाही. कुटुंबातील सदस्यांप्रमाणे प्रेम करणारे नातलग, मित्र, मैत्रीण, आणि सभोवतालच जग हेही कुटुंबाचा एक भागच आहे कारण प्रेमाचा आणि आनंदाचा रेशीम धागा म्हणजेच कुटुंब होय. आजकाल कुटुंब छोटे, प्रेम मोठे या संकल्पनेनुसार  जवळजवळ प्रत्येक कुटुंब हे छोटे कुटुंब सुखी कुटुंब या न्यायाने चार ते पाच सदस्यांचेच असते. त्यामुळे आतापर्यंत परंपरागत एकत्र कुटुंब पद्धती जपणा-या भारतीयांनी विभक्त कुटुंबाची ही नवी पद्धतही आत्मसात केली आहे. आणि पूर्वी भरपूर माणसांत वावरण्याची सवय असलेल्यांनी आता छोटया कुटुंबातही आपला आनंद शोधला आहे. पण ही परिस्तिथी ग्रामीण भागात नसून शहरी भागात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. कुटुंब कितीही लहान असो किंवा मोठे असो मग ते दोन माणसंच असो किंवा दहा माणसांच असो तेथे कुटुंब नियोजन तितकच महत्वाचं, लोकसंख्या वाढ असो-नसो, तरीपण कुटुंब नियोजन सर्वांनीच केले पाहिजे. कुटुंबात एकटया स्त्रीवर मातृत्वाचा व देखभालीचा ताण पडतो. तसेच जास्त बाळंतपणे म्हणजे महिलेवर जास्तीत जास्त शारीरिक व मानसीक ताण, जास्त आजार, पाळणा लांबवणे – थांबवणे, दोन्हीही, स्त्रिया व मुलांच्या दृष्टीने सुखाचे आहे. म्हणूनच कुटुंब नियोजनाचे महत्त्व आहे. कुटुंब नियोजनाचा इतका प्रसार – प्रचार होऊनही अपेक्षेप्रमाणे यश मिळत नाही. या प्रश्नांचे उत्तर  सर्वांनी मिळून शोधणे गरजेचे आहे. कुटुंब लहान ठेवायचे तर त्यासाठी योग्य विचारसरणी सामाजिक व आर्थिक परिस्थिती असावी लागते. लहान कुटुंबाचे महत्त्व आपण लहानपणापासूनच शिकत आलो आहोत. तरी देखील त्यामध्ये अजूनही पाहिजे तेवढी सुधारणा झालेली दिसून येत नाही.  पुरुषप्रधान व्यवस्थेत वारसाहक्क मुलाकडे जातो. यामुळे आहे ती साधनसंपत्ती दुसऱ्याच्या घरी जाऊ न देणे ही एक गरीब कुटुंबाला गरज वाटू लागते व ही संपत्ती टिकवून ठेवण्याकरिता मुलगा होईपर्यंत वाट पहिली जाते. ही करणे देखील विचार करण्यास भाग पडणारी आहेत. म्हणून प्रत्येक पति- पत्नीने मिळून आपले कुटुंब नियंत्रीत कसे राहील याचा विचार करणे व अंमलबजावणी करणे ही काळाची गरज झाली आहे. “कुटुंब लहान सुख महान” या उक्तीप्रमाणे लहान कुटुंब व्यवस्था कशी राहील यावर भर देणे महत्त्वाचे आहे.
प्रत्येक मनुष्य हा समाजाचा एक घटक आहे. हे प्रत्येकाने जाणून त्यानुसार सामाजिक बांधिलकी जपली नाही, जबाबदारी ओळखून वागले नाही तर सामाजिक प्रश्न निर्माण होऊन समाज व्यवस्था बिघडून जाते. आजचा समाज बर्‍याच अंशी भरकटत चालला आहे. याचे मूळ कारण म्हणजे समाज ज्यांच्या एकत्र येण्याने बनला आहे ती कुटुंबे योग्य मार्गावर नाहीत. कौटुंबिक व्यवस्था पार बिघडल्यामुळे अनेक कौटुंबिक प्रश्‍न, समस्या निर्माण झाल्या आहेत.माणसाचे संसारी जीवन सुखी, आनंदी होण्यासाठी कौटुंबिक प्रश्नांवर मात करायला हवी. त्यासाठी कोलमडत असलेली कुटुंब व्यवस्था… मग ती एकत्र असो वा विभक्त… ती सावरण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी आपल्या गरजा जर माणसाने कमी केल्या तर पैशांच्या मागे त्याला धावावे लागणार नाही. म्हणजे मग कुटुंबासाठी त्याच्याकडे वेळ राहील. त्यासाठी कुटुंबातील प्रत्येक घटकाने – ‘‘एकमेकांना जाणून घेऊ, एकमेकांशी जुळवून घेऊ, एकमेकांना साह्य करू, एकमेकांना सुखी-आनंदी करू’’… या मूलमंत्राचा ध्यास घेऊन तो आचरणात आणायला हवा. बदलत्या काळाची ती एक मोठी गरज आहे.    
              सर्व वाचकांना व वाचक कुटुंबियांना जागतिक कुटुंब दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा....!

       ◆◆संकलन◆◆
अर्जुन तुळशिराम फड
इतिहास अभ्यासक व लेखक
■ तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी ■
मो.9921381005

No comments:

Post a Comment