तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 16 May 2018

भाजप विचारांशी वाहून घेतलेल्या निस्पृह व्यक्तिमत्वाचा होणार गौरव

प्रा.गणपतराव राऊत यांचा सपत्नीक आमृत महोत्सवी सत्कार सोहळा.

विधानसभाअध्यक्षासह ,मंत्री ,खासदार, आमदारांची राहणार उपस्थिती.

नांदेड: राम सोनवणे

         भारतीय जनता पार्टी चे  विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवत असतांना स्वत:च्या तत्वांशी व विचारांशी कधीही तडजोड केली नाही. सर्व जातीधर्मांच्या व्यक्तीसोबत सलोखा निर्माण करतांनाच कुठेही कटुता निर्माण होऊ न देण्याच्या प्रा.गणपतराव राऊत  यांच्या गुणामुळे त्यांचा व त्यांना खंबीरपणे साथ देणार्या धर्मपत्नी सौ .सुनंदा गणपतराव राऊत यांचा  समीतीच्या वतीने १८ मे रोजी आमृत महोत्सव सपत्नीक  सत्कार आयोजीत केला असुन विशेष बाब म्हणजे या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष ना.हरीभाऊ बागडे हे अध्यक्ष म्हणुन उपस्थित राहणार आहेत.
                भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा. गणपतराव राऊत यांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केली त्यांचे भारतीय जनता पक्षातील योगदान महत्त्वाचे आसल्या कारणाने निकटवर्तीयांच्या वतीने एक समिती गठीत करण्यात आली असून त्यांचा अमृत महोत्सव सत्कार सोहळा १८ मे रोजी सकाळी ९ वा.मातोश्री मंगल कार्यालय सिडको रोड कौठा नांदेड येथे आयोजित केला आहे या समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष ना.हरिभाऊ बागडे  तर प्रमुख पाहुणे म्‍हणून पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, कौशल्य विकास मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, खासदार डॉ.सुनील गायकवाड , माजी मंत्री डी बी पाटील , आ. प्रतापराव पाटील चिखलीकर, आ. तुषार राठोड , भाजपाचे जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष डॉ संतुकराम हंबर्डे यांच्यासह बालासाहेब पांडे ,धनाजीराव देशमुख ,गंगाप्रसाद ठक्करवाड,बाबुराव गंजेवार, श्रावण भिलवंडे , देविदास राठोड, चैतन्य देशमुख ,किरवाडे बिडवई, तुकाराम वाडकर गंगाराम जोशी यांची उपस्थिती राहणार आहे.
                        प्रा.गणपतराव राऊत  सरांचे व्यक्तिमत्व उत्साही, कार्यात झोकून देणारे असे बहुरंगी स्वरुपाचे असुन त्यांनी  विविध विषय आक्रमकतेने परंतु संयमाने मांडले आहेत . भाजप चळवळीमध्ये त्यांनी तरुणाईला दिशा दिली. वंचितांसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठीच त्यांनी कार्य केले. सरांनी तत्वांशी कधीही तडजोड न करता सर्वांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले. विविध क्षेत्रात काम करतांना राऊत  सरांनी माणसे जोडली. परस्परांबाबत आदरभाव जपला. अमृत महोत्सवानिमित्त प्रा.गणपतराव राऊत व त्यांच्या धर्मपत्नी सौ सुनंदा गणपतराव राऊत यांचा होणारा हा सत्कार वास्तविक पाहता संघर्षाचाच सत्कार असुन या कार्यक्रमास दिग्गज नेते हजेरी लावणार आसल्याने विशेष महत्व आले आहे.याप्रसंगी गौरव.विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे .या कार्यक्रमास उपस्थीत रहावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष सदाशिव अंभुरे ,उपाध्यक्ष राजू गोरे व राऊत परीवार आर्धापुरकर यांचे वतीने केले आहे.


No comments:

Post a Comment