तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 16 May 2018

वसंतदादा साखर कारखान्याला संतप्त शेतकऱ्यांनी ठोकले टाळे.


चार महिने उलटूनही ऊसाचे पैसे मिळत नसल्याने आज संतप्त शेतकऱ्यांनी देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील वसंतदादा सहकारी साखर कारखान्यावर धडक दिली. मुख्य प्रवेशद्वाराला टाळे ठोकून अनागोंदी व हुकुमशाही कारभाराचा जोरदार निषेध केला. या कारखान्याचे मुख्य प्राधिकृत अधिकारी, भाजपा आमदार डॉ. राहुल आहेर यांना या आंदोलनाने मोठा दणका बसला आहे.हा साखर कारखाना तीन वर्षांपासून बंद होता. मुख्य प्राधिकृत अधिकारी, भाजपा आमदार राहुल आहेर यांच्या पुढाकाराने यावर्षीचा गळीत हंगाम सुरू करण्यात आला. चांदवड, देवळा, कळवण, सटाणा, मालेगाव या तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस दिला. अनेकदा कारखान्याचे उंबरे झिजवून व चार महिन्यानंतरही ऊसाचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या संतापाचा कडेलोट झाला. आज सकाळी शेकडो संतप्त शेतकरी घोषणाबाजी करीत, अनागोंदी व एकतर्फी कारभाराचा निषेध करीत कारखान्यावर धडकले, तेथे कोणीही जबाबदार अधिकारी हजर नव्हते. यानंतर शेतकऱ्यांनी कारखान्याचे प्रशासकीय कार्यालय, आसवणी प्रकल्प आणि मुख्य प्रवेशद्वाराला टाळे ठोकून निषेध व्यक्त केला आणि सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांकडे चाव्या सुपूर्द केल्या.या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंडितराव निकम, वसाका बचाव कृती समितीचे प्रभाकर पाटील, बाजार समितीचे माजी संचालक श्रीराम देवरे, नाना आहेर, भास्कर पवार, कडू पवार, संजय निकम,तानाजी निकम, प्रभाकर जाधव, गोपाळ शिंदे, सुधाकर निकम, अण्णा निकम, रामकृष्ण जाधव, कारभारी पवार, कैलास शिंदे, वंजार कोळी, ताराचंद चव्हाण, भास्कर पवार, शशीकांत निकम, कुबेर जाधव, भीमराव पवार, पोपट शिंदे, प्रवीणनिकम, धनंजय बोरसे, मनोहर आहेर, अमृत निकम, उद्धव वाघ, संजय निकम, प्रदीप अहिरराव, अमृत निकम, सुहास निकम यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment