तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 16 May 2018

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ ची परीक्षा ८ जुलै एवेजी १५ जुलै २०१८

बाळू राऊत
मुंबई:-राज्यात शालेय शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेली शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) येत्या जुलै महिन्यात एकूण आठ भाषांमध्ये होणार आहे शिक्षण हक्क कायद्यात (आरटीई) इयत्ता पहिली ते आठवी सर्व व्यवस्थापन, परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित आदी शाळांमध्ये शिक्षण सेवक किंवा शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असल्याचे नमूद केले आहे. त्यानुसार राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षक होण्यासाठी टीईटी उत्तीर्णतेची अट घातली आहे. त्यानंतर डीएड शिक्षकांना अभियोग्यता आणि बुद्धीमापन चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने महाराष्ट्र  शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ (TET )चे आयोजन करण्यात आले होते .ही परीक्षा ०८ जूलै २०१८ रोजी घेण्याचे वर्तमान पत्रातून प्रसिध्द केले होते .परंतु सदर तारीखेच्या दिवशी  UGC मार्फत  NET च्या  परीक्षेचे आयोजन केले आहे.एकाच तारीखेस दोन्ही परीक्षा आल्याने विद्यार्थांचे नुकसान होऊ नये म्हणून  सदर परीक्षा  ०८ जूलै २०१८ एवेजी १५ जूलै २०१८ रोजी होणार आहे .या पूर्वी प्रसिध्दी केलेल्या तारखेनुसार  महाराष्ट्र  शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ (TET ऑनलाईन ) आवेदन पत्रे व शुल्क भरण्याची आंतिम मुदत १५ मे २०१८ होती .या मुदतीत वाढ करून ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याची मुदत २२ मे २०१८ वाढवण्यात येत आहे
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ चे सुधारित वेळापत्रक
ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी : २५.०४.२०१८ ते  २२.०५.२०१८
प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून  घेणे : ०२.०७.२०१८ ते १५.०७.२०१८
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर I दिनांक वेळ : १५.०७.२०१८ वेळ १०:३० ते १३:००
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर II दिनांक वेळ : १५.०७.२०१८ वेळ १४: ०० ते १६:३०
सदर बदलाची नोंद परीक्षार्थींनी घ्यावी

No comments:

Post a Comment