तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 17 May 2018

आरोग्य विभागाच्या तत्पर सेवेमुळे मातेने दिला जुळ्यांना सुखरुप जन्म

फुलचंद भगत-
मंगरुळपीर:-१७ मे रोजी सकाळी २:१०वाजता प्रा आ के वनोजा जि वाशिम येथे सौ ज्योती नामदेव सुर्वे या मातेला प्रसूती करिता नातेवाईकांनी दाखल केले. त्यांचे मुळ गाव येलदरी ,ता जिंतूर जि परभणी असुन संपुर्ण कुटुंब रोजगरनिमित्त गावोगावी भटकंती करत असून यादरम्यान दि 09।02 । 2018 रोजी प्रा आ के सुल्तानपुर जि बुलडाणा येथे मातेची नोंदणी केली. मेहकर येथे सोनोग्राफी केली असता त्यांना जुळे बाळ असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सदर मातेने कुठेच उपचार घेतला नाही.
             दि 15।05 ।2018 रोजी वनोजा जि वाशिम ते शेंदुर्जना मोरे या रस्त्याच्या बांधकामा करिता सदर कुटुंब स्थलांतरित झाले. दि17।05।18 रोजी सकाळी 2. 10 वाजता प्रा आ के वनोजा येथे नातेवाईकांनी सदर मातेस प्रसूती वेदना सुरू झालेल्या असल्याने प्रसूती करिता दाखल केले. प्राथमिक तपासणी कु योगिता पि गव्हाळे( मुख्यालयीन ANM) यांनी करून वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत वाघमारे यांना सदर जुळे बाळ गर्भाशयात असलेल्या(  primi with labour pain with full dilatation of cervix) मातेबद्दल माहिती दिली. वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत वाघमारे यांनी लगेच मातेची तपासणी करून प्रसुती प्रा आ के वनोजा येथेच करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 104 या मोफत आरोग्य व सल्ला केंद्राशी संपर्क साधून मार्गदर्शन घेतले.  यावेळी पुणे येथील प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ विद्याधर रानडे सर यांनी मोलाचे मार्गदर्शन तथा उपचारा बाबत सुचना केल्या. सकाळी 2.24 वा पहिले बाळ( वजन 2240 ग्रॅम, लिंग पुरुष) जन्मास आले व सकाळी 3. 01 वा दुसरे बाळ( वजन 2500 ग्रॅम, लिंग पुरुष ) जन्मास आले. कु योगिता गव्हाळे व डॉ प्रशांत वाघमारे यांनी आपले कौशल्य पणाला लावून सदर मातेची अवघड प्रसूती सुखरूप पार पाडली. यानंतर दोन्ही बाळास  इंजे व्हिटॅमिन के,  झिरो पोलिओ, इंजे हिपॅटायटीस बी देऊन मातेस व बाळास पुढील उपचारा करिता 108 रूग्णवाहिकेद्वारे वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे संदर्भित केले.
         या ठिकाणी उल्लेखनीय बाब म्हणजे डॉ प्रशांत वाघमारे हे प्रा आ के आसेगाव येथे कार्यरत असतांना दि 21।10।2016 रोजी उपकेंद्र सनगाव  येथे अश्याच प्रकारची जुळे बाळ असलेल्या मातेची प्रसूती सुखरूप केल्याने त्यांचा सत्कार तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मा गणेश पाटील (IAS) साहेब यांच्या हस्ते झाला होता तसेच प्रा आ के वनोजा येथे कु योगिता गव्हाळे ANM यांनी सन 2015- 16 मध्ये 2, सन  2016 -17 मध्ये 1 अशा एकुण 3 माता ज्यांना जुळे बाळ आहे अशा मातांची सुखरुप प्रसूती केली.
        यावेळी डॉ प्रशांत वाघमारे यांनी मा दिपक कुमार मीना  मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ दिपक सेलोकार जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ सुनिल मेहकरकर अति जिल्हा आरोग्य अधिकारी व डॉ प्रदीप नव्हाते तालुका आरोग्य अधिकारी यांच्या अपेक्षेनुरूप सर्वसामान्य जनतेला कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने प्रभावीपणे आरोग्य सेवा देण्याचा मनोदय व्यक्त केला.                                     फुलचंद भगत,मंगरुळपीर/वाशिम मो.9763007835

No comments:

Post a Comment