तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Tuesday, 15 May 2018

महिला पोलिसाच्या मुलीची उत्तम कामगिरी व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत पटकावले ५ सुवर्णपदक

बाळू राऊत
मुंबई: दि.१५ मुंबई पोलीस खात्यात कर्तव्यावर असलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (बक्कल नं. 961404) मंदाकिनी खामकर यांची मलगी भक्ती हिने 61 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत उत्तम कामगिरी करून 5 सुवर्ण पदके पटकावली आहेत. सदर पदके 300 मीटर राष्ट्रीय / सिव्हिलियन गटात वैयक्तिक / सांघिक गटात 4 सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. 300mtr World Cup - 2018 साठी निवडचाचणी करिता निवड झाली आहे. हि स्पर्धा South Korea येथे होणार आहे. 61 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत भक्तीने उत्तम नेमबाजी करून 600 पैकी 585 गुण मिळवून 2017 सालचा स्वत:चा राष्ट्रीय विक्रम  मौडीत काढून नवा विक्रम केला आहे. या स्पर्धेत उत्तम नेमबाजी करणारी भक्ती ही मुंबई पोलीस दलात कर्तव्यावर असलेल्या सपोउनि (ASI) मंदाकिनी खामकर यांची मुलगी आहे, हे कळल्यावर या स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येकाने भक्तीचे कौतुक केले.
भक्ती खामकरचा आतापर्यंतचा प्रवास
     भक्ती खामकर ही जी. एन. खालसा कॉलेजची विद्यार्थिनी आहे. पोलीस खात्यात असलेल्या आई सपोउनि मंदाकिनी खामकर यांच्या पावलावर पाऊल ठेवत भक्तीने सन 2015 साली महाराष्ट्र रायफल शूटिंग (वरळी, मुंबई) मध्ये प्रशिक्षणाला सुरुवात केली. आई मंदाकिनी खामकर यांच्यासोबत (आई चे किट वापरून) भक्तीने सराव सुरू करून अवघ्या काही दिवसांत भक्तीने परफेक्ट टारगेट गाठले. सन 2015 ते 2017 दरम्याम महाराष्ट्र राज्य नेमबाजी स्पर्धांमध्ये भक्तीने 3 सुवर्ण व 1 कांस्यपदक पटकावले. तसेच 2015 ते 2017 मध्ये 50mtr राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा मध्ये 3 सुवर्ण  2 रौप्य 4 कासय पदके प्राप्त केलेली आहे.
      त्रिवेंद्रमध्ये झालेल्या 61 राष्ट्रीय स्पर्धेत 2017 (50mtr) भक्तीने उत्कृष्ट कामगिरी तसेच 1ली व 2री निवड चाचणी मध्ये पहिल्या क्रमांकाचे असल्याने  केल्याने  ISSF Junior World Cup - 2018 Australia Sydney  या स्पर्धेसाठी निवड झाली होती. या स्पर्धेत  सहाव्या स्थानकावर समाधान मानावे लागले.
भक्तीच्या बाबतीत घडलेली सुवर्ण आठवण
सिडनी येथे स्पर्धा संपवून भारतात 300mtr च्या स्पर्धा सुरू होत्या. पहिल्या दिवशी पहिल्या डिटेल मध्ये भक्ती स्पर्धेत सहभागी झाली. सरावाला वेळ मिळाला नसतानाही भक्तीने (300 मीटर) पहिल्याच दिवशी चोख निषाणा लावत 600 पैकी 585 गुणांचे आव्हान इतर स्पर्धकांच्या पुढे ठेवले मात्र हे आव्हान कोणालाही पार करता आले नाही. या कामगिरीमुळे वरिष्ठ गटात सहभागी झालेल्या वयाने सर्वात लहान असणाऱ्या भक्तीचे सर्वांनीच तोंडभरून कौतुक केले.
      3री व 4थी (50mtr) निवडचाचणी उत्तम प्रकारे, पहिल्या क्रमांकाचे score देत भक्ती ही 1. ISSF Junior World Cup 2018, Germany Suhl.  2. Shooting Hops Championship 2018 Germany Plzen हि स्पर्धेत निवड झाली असून 12 जून ते 15 जुलै पर्यंत आहे. मुंबई  पोलिसाच्या मुलीने उत्तम कामगिरी करून मुंबई पोलीस खात्यासह भारताचे नाव सातासमुद्रापार चमकावले आहे. नेमबाजीची स्पर्धेसाठी अत्याधुनिक रायफल किट महत्त्वाचे असते. या दोन्ही गोष्टींची कमतरता असतानाही भक्तीने तिच्याकडे असलेल्या साध्या किटने उत्तम निषाना साधला आहे.

No comments:

Post a Comment