तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Friday, 18 May 2018

कोकणात सर्वदुर मेघगर्जनेसह पाऊस. कोकणात सर्वदुर मेघगर्जनेसह पाऊस.

अचानक सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास आभाळात मेघ दाटून आले…विजांचा कडकडाट… ढगांचा गडगडाटासह वरुण राजाचे आगमन रत्नागिरीत झाले.गेला आठवडा भर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस कोसळत होता. त्यामुळे कडक उन्हाळ्यामुळे त्रस्त झालेले रत्नागिरीकर पावसाची वाट पाहत होते. आज सायंकाळी रत्नागिरी शहर आणि परिसरात मळभ दाटून आले. सायंकाळी साडेपाच वाजता मेघगर्जनेसह वरुणराजाचे आगमन झाले. पाऊस सुरू होताच वीजपुरवठा खंडित झाला.नोकरदार वर्ग कार्यालयातून बाहेर पडत असताना अचानक आलेल्या पावसाने काहींचा खोळंबा केला. पहिला पाऊस म्हणून अनेकांनी मनसोक्त चिंब भिजण्याचा आनंद घेतला. काहींनी मात्र दुकानाचे आडोसे पकडून पाऊस जाण्याची प्रतीक्षा केली.

No comments:

Post a Comment