तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 14 May 2018

संवेदनशील पुरूषी मने घडविण्याची गरज - आनंद पवार


शांताराम मगर प्रतिनिधी वैजापुर

संवेदनशील पुरूषी मने घडविण्याची गरज असल्याचे मत सम्यक सेवाभावी संस्थाचे कार्यकारी संचालक आनंद पवार यांनी व्यकत केले .सम्यक संस्था व क्रांती ज्योती सविञीबाई फुले अभ्यास केद्र यांच्या वतीने पुणे येथे पञकारांसाठी जेडर पितृसत्ता लैगिक प्रजनन वआरोग्य हकक या विषयावर पाच दिवसांची कार्यशाळा  आयोजीत करणयात आली होती.या कार्यशाळेसाठी ग्रामीण भागातील प्रत्येक जिलहयातुन दोन पञकारांची निवड करणयात आली होती यावेळी संस्थेचे स्ञी अभ्यासक प्रीत मंजुषा ,प्रकलप समन्वयक शिरीष वाघमारे,प्रज्ञा मोळावडे ,बळीराम जेठे आदिची प्रमुख उपस्थिती होती.
     स्त्री-पुरुष विषमतेबद्दल आणि समानतेबद्दल पुरुष कसा विचार करतात? काय वाटतं त्यांना या विषयी? मागील दशकभराच्या अनेक स्तरांतील पुरुषांसोबत समानतेविषयक सात्यत्याने करीत असलेल्या कामातून निदर्शनास आलेली काही निरीक्षणे यावेळी मांडण्यात आली . मुळात विषमता- समानता- समता- हिंसाचार ही भाषाच पुरुषांच्या रोजच्या जगण्याची किंवा चर्चेची नसल्याचे दिसून येते अणि अशी भाषाच जेव्हा स्थापित नसते तेव्हा त्या विषयांबाबतचे चिंतनही समाजात होताना दिसत नाही. उदाहरणार्थ, मागील सहा महिन्यांमध्ये आपण आपल्या कुटुंबात लोकशाही, लोकशाही मूल्ये, भारतीय राज्यघटना या विषयी आपल्या कुटुंबीयांशी कधी चर्चा केली आहे का? जर आपण असे बोललो नसू तर त्याचा अर्थ आहे की आपल्या कुटुंबात भारतीय राज्यघटना हा विषय आपण केवळ संसदीय राजकारणाचा समजतो. मात्र कुटुंबांमधील नातेसंबंधात लोकशाही मूल्ये रुजण्याची शक्यता त्यामुळे दुरावताना दिसते. कुठल्याही विषयाची व्यापक चर्चा समाजात स्थापित व्हायची असेल व परिवर्तन घडवायचे असेल तर आधी त्या विषयाची व परिवर्तनाची भाषा स्थापित व्हावी लागते.असे मत आनंद पवार यांनी यावेळी व्यकत केले. या कार्यशाळेसाठी वैजापुर तालुकयासह राज्यभरातील पञकारांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment