तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 15 May 2018

वाटसरुच्या कोरड्या घशाला राजु  मानेच्या पानपोईचा ओलावा

फुलचंद भगत

मंगरुळपीर-तप्त ऊन्हाळा आणी वाटसरुच्या घशाला पडलेली कोरड याचा कानोसा घेवुन येथील लघु व्यावसाईक तथा सामाजिक दायीत्वासोबतच काम करणारे एक पञकार राजु माने यांनी त्यांच्या दुकानापीढे शुध्द आणी थंड पान्याची पानपोई लावुन वाटसरुच्या कोरड्या घशाला जणु ओलावा दिला आहे.

चष्मा व्यवसायातुन दोन पैसे कमावून आपल्या कुटुंबाचा ऊदरनिर्वाह करणारे आणी आपल्या लेखणीच्या माध्यमातुन सामाजीक ृृृॠण फेडणारे पञकार राजु माने यांनी गेल्या चार वर्षापासुन ऊन्हाळ्यामध्ये वाटसरुंना थंड आणी शुध्द पाणी प्यायला मिळावे या ऊदात्त हेतुने आंबेडकर चौकातील त्यांच्या चष्म्याच्या दुकानासमोर आरओ च्या शुद्ध पान्याची पानपोई लावली.सुरवातीला फक्त एक आरओची एक कॅन पिन्याला ऊपलब्ध केली आणी सध्या दिवसाला पंधरा ते विस कॅन पाणी पानपोईवर ऊपलब्ध करुन देत आहेत.खेड्यापाड्यातुन शहरात कामानिमित्त किंवा खरेदीसाठी आलेले लोक मोठ्या आनंदाने पाणी पितात आणी तृप्त होतात हे बघुन मला खुप समाधान होते एवढेच नाही तर माझ्या मुलाबाळांना मिठाई,खावू,आईसक्रीम यावरचा खर्च बंद करुन त्या पैशात लोकांना शुध्द आणी थंड पाणी पाजतो यातच खरी समाजसेवा आहे असे मत राजु माने यांनी व्यक्त केले.मंगरुळपीर शहरात सध्या तिव्र पाणीटंचाई ऊग्र रुप धारण करीत आहे त्यातच पान्यावरुन राजकारण करणारेही कमी नाहीत.एखादे टॅकर वाटुन फोटो,बातम्या देवुन लोकांमध्ये हिरोगीरी करणारांची गर्दीही फारच पण मला प्रसिध्दी नाही तर लोकांचा कोरडा घसा ओला करुन,पाणी पाजुन लोकांना तृप्त करणे यातच माझे भाग्य असे म्हणनारे राजु माने कदाचित एकमेव असतील आणी आपमतलबी दुनियेत निस्वार्थ भावनेने इतरांची तृष्णातृप्ती करणारे राजु माने दुर्मीळच.

फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.9763007835

No comments:

Post a Comment