तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 15 May 2018

सासु सासऱ्याची सेवा करा — माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे

मराठा समाजाचा आगळावेगळा विवाह

सुभाष विठ्ठलराव गावंडे यांची उच्चशिक्षित कन्या चि. सौ. का. ज्योती तथा  उच्चशिक्षित वर चि. किशोर कोपरकर ह्यांचे लग्न पारंपारिक पद्धतिला फाटा देत आगळ्या वेगळ्या थाटात पार पडले ...
माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे, माजीमंत्री गुलाबराव गावंडे, रितेश मलिक माजी पं.स. सभापती लक्ष्मिकांत महाकाळ, भाजपा प्रदेश सदस्य सुरेश लुंगे, डाॅ. आशिष देशमुख यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन व हारार्पण झाले.
वर व वधुने राजमाता जिजाऊंना *जिजाऊ वंदनेची मानवंदना* दिली.
या दिमाखदार सोहळ्याचे नियोजन संचालक विठ्ठलराव गावंडे,नगरसेवक अनिल गावंडे, निखिल राजकुमार गावंडे यांनी केले.
या आगळ्या वेगळ्या विवाहप्रसंगी गृहराज्यमंत्री रणजित पाटील, उपसभापती मानिकराव ठाकरे, खासदार भावनाताई गवळी,
तसेच आमदार गोपिकिशन बाजोरिया, यांनी दुरध्वनीवरून वर वधुला शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.
माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी आपल्या आवडीचे गीत  गायन करून सर्वांचे लक्ष वेधले. सासु सासऱ्याची सेवा करा म्हणजे घरात तंटाच होणार नाही. अशा प्रकारे लग्नामध्ये गुलाबराव गावंडे यांनी प्रबोधन  करून लोकांची मने जिंकली.  जिजाऊ वंदनेचे नियोजन मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष गोपाल गावंडे यांनी तर संचलन अरूण इंगळे यांनी केले.                                   फुलचंद भगत,मंगरुळपीर/वाशिम मो.9763007835

No comments:

Post a Comment