तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 16 May 2018

येडियुरप्पांच्या शपथविधीनंतर काँग्रेसचे चार आमदार 'नॉट रिचेबल'.


त्रिशंकू विधानसभा, जेडीएस-काँग्रेसची निवडणुकीनंतरची युती, सत्ता स्थापनेचे दावे, त्यानंतर भाजपा विरुद्ध काँग्रेस-जेडीएस यांनी केलेले आरोप-प्रत्यारोप, राज्यपालांनी रात्री भाजपाला सत्ता स्थापनेचं निमंत्रण आणि त्यानंतर पहाटेपर्यंत सर्वोच्च न्यायालयात झालेली सुनावणी, अशा नाट्यपूर्ण घडामोडी कर्नाटकमध्ये घडत आहेत. सत्ता स्थापनेसाठी कर्नाटकात राजकीय नाटक सुरुच आहे. सध्या यात भाजपानं आघाडी असून पक्षाचे विधीमंडळ नेते येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 75 वर्षांच्या येडियुरप्पा यांनी तिसऱ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी भाजपाला 15 दिवसांची मुदत दिली आहे. एका अपक्ष आमदारानं भाजपाला पाठिंबा दिल्यानं भाजपाचं संख्याबळ 105 वर पोहोचलं आहे. त्यामुळे बहुमतासाठी त्यांना आणखी 7 आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. हा बहुमताचा आकडा भाजपा कसा गाठणार, यासाठीची जुळवाजुळव भाजपाकडून कशी केली जाणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणारआहे.

No comments:

Post a Comment