तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 12 May 2018

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष घोषीत करन्याची मागणी

फुलचंद भगत

वाशिम-गेल्या दोन वर्षापासुन विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची घोषणा महाराष्ट सरकारने केली अाहे पण अद्यापपर्यत या स्मारक समितिच्या अध्यक्षाची घोषणा केलेली नाही तरी त्वरीत बाबासाहेबांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षाची घोषणा महाराष्ट सरकारने करावी अशी मागणी विदर्भवादी नेते दत्तराव धांडे यांनी मुख्यमंञी देवेंद्र फडणविस यांचेकडे केली आहे.

महाराष्ट हा महापुरुषांच्या वारसाचे केद्रबिंदु आहे त्यामुळे महापुरुषांची विचारधारा अविरत तेवत राहावी आणी महाराष्टातील जनतेला प्रेरणा मिळावी या अनुषंगाने महाराष्टामध्ये छञपती शिवाजी महाराज आणी लोकशाहीर अन्नाभाऊ साठे यांच्या स्मारकांची घोषणा केली आणी या स्मारक समितीचे अध्यक्षही सरकारने घोषीत केले.याचप्रमाणे विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची घोषणा दोन वर्षापुर्वीच देवेंद्र फडणविस सरकारने केली परंतु अद्यापपर्यत या स्मारक समीतीच्या अध्यक्षाची घोषणा करुन निवड केलेली नाही हे आंबेडकरी जनतेला न ऊलगडणारे कोडे आहे त्यामुळे सरकारने त्वरीत बाबासाहेबांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षाची घोषणा करावी अशी मागणी विदर्भवादी नेते दत्तरावजी धांडे यांनी राज्याचे मुख्यमंञी देवेंद्र फडणविस यांचेकडे केली आहे.

फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम

मो.9763007835

No comments:

Post a Comment