तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 16 May 2018

पवित्र रमजान महिन्यात भारनियमन बंद करा;राकाँची मागणी

प्रतिनिधी

पाथरी:- गुरूवार १७ मे पासुन पवित्र रमजान महिना सुरू होत आहे. या वेळी मुस्लीम बांधव रोजे धरतात त्या मुळे या महिण्यात उन्हाचा त्रास जानऊ नये म्हणून विजेचे भारनियमन रद्द करावे अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतिने सहायक कनिष्ठ अभियंता विज वितरण पाथरी यांना निवेदना व्दारे करण्यात आली आहे.
पाथरी शहर आणि तालुक्यात विज वितरण च्या वतीने दरदिवशी भारनियमन करण्यात येते शहरात पहाटे पाच ते साडे दहा वाजे पर्यंत भारनियमन करण्यात येते.या वर्षीचा पवित्र रमजान महिना १७ मे पासुन सुरू होत असुन या काळात मुस्लीम बाधव पहाटे तीन वाजल्या पासून धार्मीक कार्यास सुरूवात करतात त्या मुळे महावितरण च्या वतिने करण्यात येणारे भारनियमन गैरसोईचे होत असल्याने पाथरी शहर आणि तालुक्यातील विजेचे भारनियमन रद्द करण्याची मागणी सहायक कनिष्ठ अभियंता पाथरी यांच्या कडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने बुधवार १६ मे रोजी निवेदना व्दारे करण्यात आली आहे. या निवेदनावर नगराध्यक्ष नितेश भोरे, तालुका अध्यक्ष एकनाथ शिंदे, नगर सेवक गोविंद हारकळ, सतीश वाकडे , शेख खालेद राष्ट्रवादी  विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष अमोल भाले पाटील, शेखअझर जिल्हा उपाध्यक्ष रा.यु काँग्रेस, अहेमद अत्तार अल्पसंख्याक शहर अध्यक्ष,दत्ता चिकने,गुलाम मुस्तफा,अल्ताफ अन्सारी उपाध्यक्ष युसुनील कांबळे, हतीम अन्सारी,  परमेश्वर महात्मे,गजानन उंबरकर व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते


No comments:

Post a Comment