तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 16 May 2018

गेवराईच्या बॅंक स्थानिक सल्लागार समितीवर गंगवाल व अरुण हुलजुते

सुभाष मुळे....
------------
गेवराई, दि. 16 __ 'बजरंग' या सामाजिक कार्य करणाऱ्या महत्त्वकांक्षी ग्रुपचे सन्माननीय सदस्य दिलीपकुमार गंगवाल आणि अरुणराव हुलजुते यांची जालना मर्चंट को. ऑपरेटिव्ह बँक गेवराई शाखेच्या स्थानिक सल्लागार म्हणून नूकतीच नेमणूक करण्यात आली आहे.
      गेवराई येथील बॅंकेच्या वतीने देण्यात आलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, आपण गेवराई येथील प्रतिष्ठित व्यापारी व समाजसेवक आहात. आपला जनसंपर्क व ज्ञानाचा लाभ बॅंक शाखेच्या विकासात व्हावा या उद्देशाने संपन्न झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत दिलिपकूमार पन्नालाल गंगवाल व अरुणराव पंढरीनाथ हुलजुते यांची सल्लागार समितीत नेमणूक करण्यात आली आहे.
       दरम्यान जालना मर्चंट को. ऑपरेटिव्ह गेवराई बॅंक शाखेचे शाखाधिकारी विलासराव पवार, विशाल धर्माधिकारी, देवेश काळबांडे, विक्रम बसय्ये, अक्षय देवगावकर, जयदिप मोटे आदींनी दिलीपकुमार गंगवाल आणि अरुण हुलजुते यांना नेमणूकीचे नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
-----------------------------------
--- जाहिरात व बातमी करिता संपर्क ----
------------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment