तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 13 May 2018

महाराष्ट्रातील राज्य मार्ग होणार राष्ट्रीय महामार्ग, प्रत्येक जिल्हा महामार्गाने जोडणार

बाळू राऊत
मुंबई: दि. १४ महाराष्ट्रातील ४० राज्य मार्गांचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गात करण्याच्या कामाने वेग घेतला आहे. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांना राष्ट्रीय महामार्गाने जोडण्याचे काम यामुळे साध्य होणार आहे. राज्यातील औरंगाबाद, नाशिक, जालना, बीड, अकोला, बुलडाणा, उस्मानाबाद, सोलापूर, जळगाव, नगर या जिल्ह्यांना याचा सर्वाधिक लाभ होणार आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, तर विदर्भातील नागपूर, अकोला, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांतून ५ ते ७ राष्ट्रीय महामार्ग जाणार आहेत.
भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने महाराष्ट्रातील सर्व कामांना मंजुरी दिली आहे. महाराष्ट्रातील ४० राज्य मार्गांचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्याच्या निर्णयाला मंजुरीचे राजपत्र ३ जानेवारी २०१७ प्रसिद्ध झाले आहे. त्यानुसार राज्यात अनेक ठिकाणी कामाला सुरुवात झाली आहे. भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाअंतर्गत नांदेड, परभणी आणि लातूर जिल्ह्यांतील रस्तेकामाचा प्रारंभ नुकताच करण्यात आला. या रस्त्याची पुनर्बांधणी आणि दर्जा उन्नतीची कामे करण्यात येणार अाहेत. यात ५४८ किलोमीटरचे काम होणार असून त्यासाठी ५३४३ कोटी रुपये खर्च येणार अाहे. हे सर्व रस्ते चार लेनचे होणार असून त्यामुळे ताशी १०० किमी वेगाने प्रवास होणार आहे.
चार राज्यांना फायदा
महाराष्ट्रातील४० राज्यमार्गांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्याने महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा आणि मध्य प्रदेश असा चार राज्यांना फायदा.
उत्तर महाराष्ट्रातील राज्य मार्गमध्य प्रदेशातील खांडवा,बुऱ्हाणपूरशी, दक्षिण व पूर्व
महाराष्ट्रातील रस्ते कर्नाटकातील भालकी, विजापूरशी आणि तेलंगणातील निझामाबाद, आदिलाबादशी राष्ट्रीय महामार्गाने जोडणार.

No comments:

Post a Comment