तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 15 May 2018

भारताचे नाव डॉ. बी.आर. आंबेडकर नेशन असे करण्याची मागणी; जिल्हाध्यक्ष म्हणून सोपान टी.फुपाटे यांची नियुक्ती

हिंगोली- सुमारे ६५०० जाती आणि जगाच्या पाठीवरील सर्वच धर्म कुठे राहत असतील तर, ते भारत या देशात असून त्यासाठी डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला दिलेली राज्यघटना कारणीभूत आहे. त्यामुळे देशाचे नाव, डॉ. बी.आर आंबेडकर इंडिया असे करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रपतींकडे करण्यासाठी अशी येथे महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ. आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष दिवाकर माने हे होते. यावेळी नित्यानंद महाराज देशमुख, सुरेश वाढे, सुरेश जमधाडे,  बाबादास महाराज, दत्तात्रय वारेकर, रमेश कदम, श्रीरंग पंडित, संतोष कुटे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना आम्ही या भारताचे लोक या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दत्तराव धांडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, स्वातंत्र्यापूर्वी भारत एक राष्ट्र नव्हता, तर भारतात विविध राजे आपापले राज्य चालवीत होते आणि ते त्यांच्यासाठी एक राष्ट्रच होते. त्यामुळे एक कायदा नाही, एकिकृत भावनेचा समाज नाही, एक निश्चित भाषा नाही की राष्ट्रीयत्वाची भावनाही नाही. राज्यांचा तुकड्यांना एकसंघ केले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी, या देशातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्यांक समाजाला तर न्याय दिलाच शिवाय अमागास समाजावरही अन्याय होवू दिला नाही. त्यामुळेच भारत आज जगातील एक महासत्ता झाला असून भारताचे नाव जगभर आदराने घेतले जाते आणि ते केवळ डॉ. बाबासाहेब आंबडकर यांनी दिलेल्या अतुल्य योगदानामुळे. त्यामुळेच भारत देशाचे नाव डॉ. बी.आर. आंबेडकर इंडिया,  डॉ. बी.आर. आंबेडकर इंडिया नेशन, बी.आर.
आंबेडकर भारत
डॉ.आंबेडकराईट नेशन ऑफ इंडिया यापैकी असावे अशी रास्त मागणी त्यांनी यावेळी केली.  यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष दिवाकर माने यांनी सांगितले, की देशाचे नाव बदलायाचे असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीच राज्यघटनेत प्रक्रिया घालून दिली आहे. या प्रक्रियेशिवाय असा बदल होणे शक्य नसल्याचे सांगून त्यांनी, हे काम करण्यासाठी कट्टर आंबेडकरवादी लोक प्रतिनिधी घडविण्याची गरज गरज व्यक्त केली. यावेळी भारताचे नाव बदलण्यासाठी ' आम्ही भारताचे लोक संघटना ' चे जिल्हाध्यक्ष म्हणून सोपान टी. फुपाटे यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पत्रकार रावण धाबे यांनी केले. बैठकीला जिल्हाभरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी लोक कवी वामनदादा कर्डक यांना स्मृतिदिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. हिंगोली येथील आंबेडकर स्मारकमध्ये झालेल्या कार्यक्रमात आम्ही भारताचे नागरीक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सोपान टी. फुपाटे यांची नियुक्ती करण्यात आली.

फुलचंद भगत मो.9763007835

No comments:

Post a Comment