तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 13 May 2018

संपत्तीच्या वादातून जन्मदात्याची चाकूने भोसकून हत्या

संपत्तीच्या वादातून जन्मदात्याची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना शहरातील बस स्थानकासमोरच्या हम रस्त्यावर रविवारी (ता.१३) सकाळी पावणेअकराच्या सुमारास घडली. त्यानंतर खूनी मुलगा घटनास्थळावरून फरार झाला.

जिंतूर : संपत्तीच्या वादातून जन्मदात्याची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना शहरातील बस स्थानकासमोरच्या हम रस्त्यावर रविवारी (ता.१३) सकाळी पावणेअकराच्या सुमारास घडली. त्यानंतर खूनी मुलगा घटनास्थळावरून फरार झाला.

साडेगाव (ता.जि.परभणी) येथील नारायण सटवाजी नवघरे (वय ४५) हे त्यांचा मुलगा राजू उर्फ राजेश नवघरे यास भेटण्यासाठी रविवारी सकाळी जिंतूरला आला होता. गेल्या कांही दिवसापासून राजूचा वडिलांशी संपत्तीचा वाद चालू होता. काही दिवसांपूर्वी नारायण नवघरे यांनी थोडीशी शेतजमीन विकून स्वतःसाठी एक चारचाकी गाडी खरेदी केली होती. त्यावरून हा वाद जास्तच चिघळला.

रविवारी नारायण नवघरे हे राजू उर्फ राजेश नवघरे यास भेटण्यासाठी जिंतूरला आले असता संपत्तीच्या वादातून दोघांमध्ये बस स्थानकावरच जोरदार शाब्दिक चकमक झाली. तेव्हा तुझी पोलिसात तक्रार करतो असे सांगून नारायण नवघरे हे पायी चालत पोलिस ठाण्याकडे निघाले असता बस स्थानकासमोरील गजबजलेल्या रस्त्यावर एका हॉटेलसमोर राजूने  स्वतः जवळील चाकूने त्यांच्या पोटात वार केले. त्यामुळे ते जागीच कोसळले.

त्यानंतर राजू नवघरेने घटनास्थळावरून पळ काढला. इकडे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नारायण नवघरे यांना काही नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. सदर प्रकरणी दुपारी उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच काम चालू होते

पो नि प्रवीण मोरे तपास करीत आहेत

असा च एक खून 3 महिन्या पूर्वी पन रोड वर झाला होता

शहरातील वाढते अवैध व्यवसाय अाश्या घटना घडण्या साठी कारनी भूत आहेत असे नागरिकात बोल्ल्या जात आहे

जिंतुर येथून तेज न्यूज साठी
प्रदिप कोकडवार

No comments:

Post a Comment