तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 17 May 2018

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाच्या कामाला गती

बाळू राऊत
मुंबई, दि. १७ : चिरागनगर (घाटकोपर) येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाच्या कामाला गती देण्याचे निर्देश सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आज दिले.
अण्णा भाऊ साठे यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यासंदर्भात गठित समितीची बैठक आज सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या दालनात झाली. त्यावेळी ते बोलत होते. या स्मारक समितीचे सामाजिक न्याय राज्यमंत्री अध्यक्ष असून लोकप्रतिनिधीसह अन्य 14 सदस्य या समितीत आहेत.
आजच्या बैठकीमध्ये अण्णा भाऊ साठे यांच्या कायमस्वरूपी वास्तव्याचे ठिकाण असलेल्या पत्राचाळ, चिरागनगर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात येणार आहे. यावेळी या बैठकीत स्मारकाची जागा निवडीची प्रक्रिया,स्मारक विकासासंदर्भात विकासकाची निवड लवकरच अंतिम करणे तसेच स्मारक समितीच्या कार्यालयाबाबतीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

No comments:

Post a Comment