तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 15 May 2018

धर्मवीर संभाजी महाराज जयंतीनिमित्त तेल्हारा येथे भव्य शोभायात्रा

विशाल नांदोकार                    
तेल्हारा दि: धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त धर्मवीर संभाजी मंडळाच्या वतीने तेल्हारा शहरातील मुख्य मार्गाने जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे च्या जय घोषात 14 मे ला भव्य शोभायात्रा काढण्यात आली       स्थानिक संभाजी चौकात संभाजी मंडळाच्या वतीने धर्मवीर संभाजीराजे च्या प्रतिमेचे पूजन करून शोभयात्रेला सुरुवात करण्यात आली शहरातील मुख्य मार्गाने जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे च्या जयघोषाने तेल्हारा नगरी दुमदुमून गेली होती टॉवर चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतड्याला संभाजी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करून जयघोष करण्यात आला काढण्यात आलेली मिरवणूक जल्लोषात व शांततेत पार पडली मिरवणुकी मंध्ये धर्मवीर संभाजी मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शहरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते या वेळी पोलीस बंदोबस्त चोख होता

No comments:

Post a Comment