तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 15 May 2018

फुलकळस येथे रुद्राभिषेक व धोंडे जेवणाचा कार्यक्रम

प्रतिनिधी
ताडकळस:- येथून जवळच असलेल्या फुलकळस येथील महात्मा बसवेश्वर माध्यमिक विद्यालय फुलकळस ता.पुर्णा येथे आज 16 मे बुधवार रोजी राष्ट्रसंत श्री सतगुरू प.पू. ष. ब्र. 108 डाॅ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांचा अधिकमासा निमीत्त रुद्राभिषेक व धोंडेजेवण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे यामधे  सकाळी 9 ते 12 पर्यंत रुद्राभिषेक व  दुपारी12 ते 01 आशिर्वचन  व त्यानंतर नंतर धोंडे जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे व तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून अखिल भारतीय विरशैव लिंगायत युवक संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर धोंडे  यांची उपस्थिती राहणार आहे  .
तसेच श्री. प.पू.ष.ब्र.108 डाॅ.नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज पुर्णा  , श्री. प.पू.ष.ब्र.108 वेदान्ताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज वसमत  , श्री. प.पू.ष.ब्र.108 नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठ  , श्री. प.पू .ष. ब्र.108 अमृतेश्वर शिवाचार्य महाराज जिंतुर आदी संत महनतांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होनार आहे .

No comments:

Post a Comment