तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 14 May 2018

महात्मा फुले जन्मभूमी खानवडी गुणगौरव सोहळा संपन्न

बाळू राऊत
मुंबई : दि.१४ महात्मा फुले विचार अभियांनातर्गत १७७ दिवस महात्मा फुले यांच्या  क्रांतिकार्याला उजाळा तसेच त्यांच्या विचारांचा प्रसार प्रचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला.अभियानाच्या काळात 10000 पेक्षा अधिक फुले दाम्पत्य प्रतिमाचे वितरण, पुस्तकाचे वितरण , महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची जयंती व पुण्यतिथी  कार्यक्रमाचे  विविध ठिकाणी संपन्न , महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची जयंती व पुण्यतिथी निमित्त विविध ठिकाणी व्याख्याने , चर्चासत्र , विविध स्पर्धाचे आयोजन , सत्यशोधक विवाह ,  फुले  विचार प्रसारकांच्या  ओळखी, फुले विचार प्रसारकांचा गौरव,सोशल मीडियावरून फुले विचारांचा प्रसार असे विविध उपक्रम राबविण्यात आले.
        दि ११ मे १८८८ रोजी जोतीराव फुले यांना मांडवी कोळीवाडा येथे  जनतेच्या वतीने महात्मा पदवी देण्यात आली. पदवी समारंभाच्या  १३० व्या सुस्मरणीय दिनी  महात्मा फुले  विचार अभियानाचा सांगता समारंभ,फुले विचारांचा प्रसार प्रचार करणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्ती व संस्था यांचा गौरव समारंभ महात्मा फुले जन्मभूमी खानवडी ता.पुरंदर जिल्हा पुणे येथील  महात्मा फुले स्मारक हॉलमध्ये संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा परिषद कृषी समिती सदस्य श्री दत्तात्रय झुरंगे हे होते. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सौ शारदा कोथिंबीरे औरंगाबाद, सौ संगीता मालकर  कोपरगाव, शुभांगी डोके मुंबई ,अशोक माळी उस्मानाबाद ,श्री संदीप सुपटकर वर्धा उपस्थित होते. याप्रसंगी  महात्मा फुले विचार अभियानात सहभागी झालेल्या सर्व फुलेंप्रेमींचा व संस्थाचा गौरव  मानवस्त्र,सन्मानचिन्ह ,गौरवपत्र देऊन करण्यात आले.                                                  महात्मा फुले सत्यशोधक पुरस्कार २०१८ या पुरस्काराने सासवड नगरपरिषद माजी उपाध्यक्ष व सासवड येथील महात्मा फुले पुतळा समिती अध्यक्ष व छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समिती सदस्य श्री सखाराम लांडगे व अभियान संयोजक , सत्यशोधक विवाह दाम्पत्य श्वेता व प्रवीण महाजन  यांना सन्मानित करण्यात आले.
               महात्मा फुले सन १८७६ ते  १८८२ या कालावधी मध्ये पुणे नगरपालिका सदस्य कार्यकाळातील महान क्रांतिकार्याचे स्मरण म्हणून फुलेवाडा परिसरातील नगरसेविका  सौ अरतीताई कोंढरे यांना पहिला महात्मा फुले कॉर्पोरेटर अवॉर्ड २०१८प्रदान करण्यात आला.
                 समाजहित व देशहितासाठी कार्य करणाऱ्या सेवाभावी समाजसेवकांना  महात्मा फुले पुरस्कार २०१८या पुरस्काराने श्री दिग्विजय माळी नंदुरबार ,संजय जाधव पुणे , विशाल नाळे फलटण, संजय शिंदे जुन्नर , जयवंत मेहत्रे सासवड , नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशज प्रा डॉ शीतल मालुसरे महाड ,श्री भरत रोकडे धुळे, श्री प्रवीण महाजन अमळनेर ,
यांना सन्मानित करण्यात आले.                                                                                                        सामाजिक ,शैक्षणिक, सांस्कृतिक , कृषी व महिला सबलिकरण या क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सौ वैशाली जाधव कराड , डॉ पुष्पा शिंदे उदापूर , सौ भाग्यश्री साळुंखे पुणे , सौ मंदाकिनी झगडे जेजुरी, महिला बाऊसर सौ दीपा परब पुणे यांना सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
               कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभियान संकल्पक व मार्गदर्शक संपतराव जाधव यांनी केले .नगरसेविका अरतीताई कोंढरे यानी महात्मा फुले नगरपालिका आयुक्त पदाच्या क्रांतिकार्याला उजाळा दिला. प्रसंगी महात्मा फुले स्मारक समिती खानवाडी सचिव श्री चंद्रकांत टिळेकर , सौ संगीता मालकर   कोपरगाव , प्रवीण महाजन अमळनेर , सौ वैशाली जाधव कराड , प्रा डॉ शीतल मालुसरे महाड , यांनी मनोगत व्यक्त केले.                         कार्यक्रम यशस्वीपणे  साजरा करण्यासाठी महात्मा फुले विचार अभियान,  सहयोगी संस्था व फुलप्रेमी,सुजनफौंडशन  ,सावित्रीबाई फुले स्मृती शताब्दी समिती ,महात्मा फुले स्मारक समिती खानवडी  जिल्हा, पूणे, ग्रामपंचायत व ग्रामस्थ खानवडी पंचक्रोशी ग्रामस्थ   मंडळ व फुलप्रेमी यांचे लाभले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री जनार्दन गार्डे यांनी केले. आभार सुजन फाऊंडेशन व महात्मा फुले अभियान मुख्य संयोजक अजित जाधव यांनी मानले .

No comments:

Post a Comment