तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 15 May 2018

कर्नाटक सत्तेचा सस्पेंस कायम.


कर्नाटक निवडणुकीत भाजपला चांगल्या जागा मिळाल्या असल्या, तरी बहुमताचा आकडा अजूनही त्यांना गाठता आलेला नाही. त्यातच आता काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा दिल्याने भाजपच्या सत्ता स्थापनेचा मार्ग अवघड झाला आहे. तर जेडीएसनेही काँग्रेसची ऑफर स्वीकारली आहे. जेडीएस 38 जागांवर आघाडी आहे, तर काँग्रेस 78 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे जेडीएसला बहुमत मिळत आहे. त्यामुळे दोघे मिळून आजच सत्ता स्थापनेचा दावा राज्यपालांकडे करणार आहे. आता राज्यपाल काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सर्व विरोधी पक्ष भाजप विरोधात एकत्र आलेले दिसत आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी देवेगौडांशी चर्चा करुन काँग्रेस सोबत जाण्याचा सल्ला दिला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील देवेगौडांना फोन करुन त्यांच्याशी चर्चा केली आहे.

कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेसाठी मोदी विरोधी एकवटले....

कर्नाटक मध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी मोदीविरोधक एकवटताना दिसत आहेत. कर्नाटकातील बहुमताचा आकडा ११२ च्या खाली आल्यानंतर, राजकीय चित्र बदलत आहे. जेडीएसने काँग्रेससोबत सत्ता स्थापन करावी म्हणून, बंगालमधून ममता बॅनर्जी, आंध्रमधून चंद्राबाबू नायडू यांनी जेडीएसचे एचडी दैवेगौडा यांच्याशी फोनवर चर्चा करण्यास सुरूवात केली आहे. एकंदरीत जोपर्यंत भाजप कर्नाटकात सत्तेच्या जवळ होता, तोपर्यंत विरोधकांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र जेव्हा भाजप बहुमतापासून ६ जागांनी दूर गेला, तेव्हा विरोधक एकवटत आहेत. एकंदरीत तासाला परिस्थिती कर्नाटकाच्या राजकारणात बदलत आहे.

No comments:

Post a Comment