तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 13 May 2018

मुंबईत संशयीत दहशतवाद्याला अटक


बाळू राऊत
मुंबई दि.१४ मुंबईत एका संशयीत दहशतवाद्याला अटक करण्यात मुंबई दहशतवादी पथकाला(एटीएस) यश आलं आहे. मोठा घातपात घडवण्याचा त्याचा उद्देश असल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. एटीएसच्या या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला आहे. मुंबई पोलीस आणि कोलकाता एटीएसच्या मदतीने एटीएस या संशयीत दहशतवाद्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती पाकिस्तानातील दहशतवादी कॅम्पमधून प्रशिक्षण घेऊन मुंबईत आल्याची माहिती मुंबई एटीएसला मिळाली होती. माहिती मिळतात मुंबई एटीएसने या संशयीत दहशतवाद्याला ११ मे रोजी मुबंईच्या जुहू येथून अटक केली. अटकेनंतर एटीएसने केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईसह देशातील गर्दीच्या ठिकाणी, अतिमहत्वाच्या व्यक्ती किंवा अतिमहत्त्वाच्या ठिकाणी हल्ला करण्याचा कट रचला असल्याची माहिती या संशयीत दहशतवाद्याने एटीएसला दिली. न्यायालयाने या संशयीत दहशतवाद्याला २१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

No comments:

Post a Comment