तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 13 May 2018

घाटकोपर येथे भव्य रोजगार मेळावा संपन्न

बाळू राऊत
मुंबई : दि.१४ ईशान्य मुंबईचे खासदार किरीट सोम्मया आणि घाटकोपर (पश्चिम ) चे आमदार राम कदम यांच्या संकल्पनेतून घाटकोपर येथे भव्य रोजगार मेळावाचे आयोजन करण्यात आले होते
भाजपा भारत सरकार श्रम आणि रोजगार मंत्रालय भव्य रोजगार मेळावा घाटकोपर येथील झुंझूनवाला कॉलेज येथे बेरोजगार तरूण तरुणींना  विविध कंपन्यांमध्ये नोकरीच्या चांगल्या संधी मिळाव्यात या उद्देशाने रविवारी, १३मे २०१८ रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत विभागीय रोजगार  मेळावा झाला.या मेळाव्याला उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला 3556 उमेदवार सहभागी; 4679 उमेदवाऱ्यांच्या मुलाखती; व 1827 उमेदवारांची जॉबसाठी निवड आणि वेगळ्या क्षेत्रातील जॉबसाठी 280 बायोडाटा घेतले.
आजच्या काळात शिक्षण पूर्ण करूनदेखील नोकरी मिळत नसल्याच्या वास्तवाला बेरोजगार तरुणांना सामोरे जावे लागते. यातून या उमेदवारांना नैराश्यासारख्या समस्यांचा सामनाही करावा लागतो. त्यामुळे नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी या मेळावाचे आयोजन करण्यात आले होते . दहावी, बारावी, गॅज्युएशन, आयटीआय केलेल्यांना यातून संधी मिळणार या कार्यक्रमास खासदार किरीट सोम्मया, आमदार राम कदम , नगरसेवक सूर्यकांत गवळी , माजी नगरसेविका रीतू तावडे , नगरसेवक नील  सोम्मया,चंद्रकांत मालकर, रवि पुज, अनीस जोश, मुरली रौधल. तानाजी मेणे, प्रविण विचारे, मनीष सालवे, चेतन चाळके, विशाल पुज, विरल पुज, सर्व भाजपा पदाधिकारी, युवा मोर्चा घाटकोपर पश्चिम विधानसभा पदाधिकारी

No comments:

Post a Comment