तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Monday, 14 May 2018

सबसेतेज,तेजन्यूज हेडलाईन्स दिवस भराच्या घडामोडी संक्षिप्त

1. कर्नाटकच्या मतदानानंतर इंधनाचे दर पुन्हा वधारले, पेट्रोल 82 रुपये लीटरवर, तर डिझेल सत्तरीपार 

2. येत्या 24 तासात पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, हवामान विभागाचा इशारा, तर उत्तर भारतात वादळबळींचा आकडा 71 वर

3. औरंगाबादमधील जाळपोळ प्रकरणी अडीच हजारांहून अधिक जणांवर गुन्हे, तर जखमी ACP गोवर्धन कोळेकरांना उपचारासाठी मुंबईत हलवलं

4. दोन कोटी विद्यार्थ्यांच्या पालकांना विमा संरक्षण, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडेंची घोषणा, पालकांच्या अपघाती मृत्यूनंतर शिक्षणातला आर्थिक व्यत्यय दूर

5. ICSE, ISC बोर्ड परीक्षांचे निकाल जाहीर, बारावीत मुंबईचा अभिज्ञान चक्रवर्ती, दहावीत नवी मुंबईचा स्वयम दास देशात पहिला

6. मुंबईत बोरीवली स्टेशनजवळ रेल्वे ट्रॅक ओलांडताना चार भावांना ट्रेनने उडवलं, नातेवाईकांना घातपाताचा संशय, चौकशी होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

7. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत वनगा कुटुंबीयांना भाजपमध्ये पाठवण्याचा प्रस्ताव शिवसेनेने फेटाळला
पलुस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपची माघार, विश्वजित कदमांच्या बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा

8. राज्यभरात छत्रपती संभाजी राजे जयंतीचा उत्साह, पुरंदर किल्ल्यावर मावळ्यांची गर्दी, खासदार संभाजीराजेंचीही उपस्थिती

9. मंत्रिमंडळात परतण्याची अजिबात इच्छा नाही, एकनाथ खडसेंची उद्विग्न प्रतिक्रिया

10. पाकिस्तानातून साखरेच्या आयातीवरुन विरोधक आक्रमक, सुकमा कंपनीने आयातशुल्काविना साखर भारतात आणल्याचा हर्षवर्धन पाटलांचा आरोप, चौकशी करण्याची पणनमंत्र्यांची ग्वाही

11. कर्नाटक निवडणुकांच्या प्रचारादरम्यान मोदींनी धमकीवजा भाषा वापरली,  माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचं राष्ट्रपतींना पत्र

12. 200, 2000 रुपयांच्या खराब नोटा बँकेत बदलता येणार नाहीत, करन्सी एक्स्चेंजच्या तरतुदी न बदलल्यामुळे अडचण

13. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि अभिनेता अनिकेत विश्वासराव यांच्या कारला लोणावळ्या जवळ अपघात, प्रार्थनाच्या हाताला दुखापत

14. गाडीचा वेग मित्रांना दाखवणं जीवावर बेतलं, इन्स्टाग्राम लाईव्ह करताना पिंपरीत कार अपघात, तरुणाचा मृत्यू

15. अभिनेता इंदर कुमारच्या मृत्यूबाबत वर्षभरा नंतर प्रश्नचिन्ह, आपण आत्महत्या करणार असल्याचं सांगतानाचा व्हिडीओ व्हायरल

कर्नाटक विधानसभा निवडणूक: पंतप्रधान मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची प्रतिष्ठा पणाला, उद्या निकालाचे सुपरफास्ट अपडेट tejnewsheadlines वर

No comments:

Post a Comment