तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 15 May 2018

वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या आयोजित पं.अतुलशास्त्री भगरे यांच्या संगीतमय श्रीमद् भागवत कथेला आजपासून सुरूवात

भाविकांनी शोभायात्रेत सहभागी व्हावे व कथेचा लाभ घ्यावा - राजेश देशमुख

परळी वैजनाथ, दि.15 (प्रतिनिधी) ः-

पुरूषोत्तम मासानिमित्त येथील श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने बुधवार (ता.16) पासून सुरू होणार्‍या पंडित अतुलशास्त्री भगरे यांच्या संगीतमय श्रीमद् भागवत कथेला शोभा यात्रेने सुरूवात होणार आहे. या शोभायात्रेत सहभागी व्हावे व कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख व त्यांच्या सहकार्‍यांनी केले आहे. 

येथील वैद्यनाथ मंदिरातील दर्शन मंडप सभागृहात हा कार्यक्रम येत्या 26 मे पर्यंत दररोज दुपारी दोन ते सात या वेळेत होणार आहे. या कार्यक्रमाला बुधवारी सायंकाळी पाच वाजता वैद्यनाथ मंदिरातून निघणार्‍या शोभायात्रेने सुरूवात होणार आहे. शहराच्या मुख्य मार्गावरून ही शोभा यात्रा निघणार असून तिचा समारोप वैद्यनाथ मंदिर परिसरातील दर्शन मंडप येथे होणार आहे नउ दिवस चालणार्‍या या कार्यक्रमात श्रीमद भागवत महात्म्य,गोकर्ण आख्यान, नारद चरित्र, भीष्माचार्य प्राणत्याग, परीक्षिती चरित्र, हिरण्य कश्यप वध, शिव सती चरित्र, कपिल अवतार,जडभरत चरित्र,आजामील आख्यान,प्रल्हाद चरित्र,नरसिंह अवतार, समुद्र मंथन,वामन अवतार,परशुराम चरित्र,श्रीराम अवतार,श्रीकृष्ण जन्म,कृष्ण बाललिला, गोवर्धन पूजा, माखनचोर लिला, रासलीला, गोपीगीत, कंस वध, उद्धव - गोपी संवाद, रुक्मिणी विवाह, श्रीकृष्ण सुदामा भेट, भागवत धर्म, श्रीकृष्ण निजधाम गमन अशा कथांचे रसास्वादन भक्तांना भेटणार आहे. या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली असून*या कथेचा भाविकांनी लाभ घ्यावा व शोभा यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन देवस्थान ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख यांच्यासह ट्रस्टचे अध्यक्ष तहसीलदार शरद झाडके ट्रस्टचे विश्वस्त प्रा. बाबासाहेब देशमुख, नंदकिशोर जाजू, प्रा.प्रदीप देशमुख, अनिल तांदळे, बाबुराव मेनकुदळे, डॉ.गुरुप्रसाद देशपांडे, नागनाथ देशमुख, रघुवीर देशमुख, शरद मोहरीर, बाळू पुजारी व त्यांच्या सहकार्‍यांनी केले आहे. दरम्यान या तयारीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी सायंकाळी वैद्यनाथ मंदिर सभागृहात बैठक झाली. या बैठकीत राजेश देशमुख यांनी हा कथा सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. या बैठकीला दत्ताप्पा इटके, राजा पांडे, वैजनाथ जगतकर, दत्तात्रय कुलकर्णी, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष धनंजय आरबुने, संजय खाकरे, प्रकाश जोशी, ओमप्रकाश बुरांडे, मुकूंद देशपांडे, अनंत कुलकर्णी, राजेश साबणे, राजेश तिळकरी,शाम गडेकर, महादेव शिंदे, शाम बुद्रे, ज्ञानेश्वर खर्डे आदी मान्यवरांसह महिला भजनी मंडळाच्या सदस्या उपस्थित होत्या. 

No comments:

Post a Comment