तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 15 May 2018

कर्तव्य फाऊंडेशनच्या वतीने परतूर येथे छञपती संभाजी महाराज जयंती साजरी

प्रतिनिधी

परतुर:-येथील मुख्य रस्त्यावरील महादेव मंदिर चौकात स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती दिनांक 14 मे सोमवार रोजी साजरी करण्यात आली यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व हातात मेणबत्त्या घेऊन त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी प्रा.पांडुरंग नवल यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनाविषयी माहिती सांगुन आजच्या तरुणांनी त्यांच्याकडून आदर्श घ्यावा याविषयी मार्गदर्शन केले . यावेळी प्रा. पांडुरंग नवल,विनायक भिसे,संदीप जगताप,महेश नळगे,सिद्धेश्वर लहाने,राजेश राऊत,सुनील चांदर,पवन अंभुरे,आशिष धुमाळ,कृष्णा ठोंबरे,सचिन चव्हाण,अतुल हजारे,सौरभ लाळे,अक्षय राऊत,गजानन मस्के,संदीप पाटील आदी जण उपस्थित होते.

No comments:

Post a Comment