तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 14 May 2018

आघाडीचे उमेदवार देशमुखांच्या पाठीशी खंबिरपणे उभे राहाण्याचा राकाँचा निर्धार

प्रतिनिधी

पाथरी:-परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे काँग्रेस-राकाँ अघाडीचे उमेदवार सुरेश देशमुख यांच्या पाठीशी राकाँ चे संपुर्ण मतदार खंबिर पणे उभे राहाणार असल्याची ग्वाही सोमवारी आ दुर्रांनी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीतील भेटीत दिली.
या वेळी आघाडीचे उमेदवार सुरेश देशमुख, आ बाबाजानी दुर्रांनी, आ विजय भांबळे यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हापरिषद सदस्य, न प सदस्य आणि पं स सभापती या मतदारांची या वेळी उपस्थिती होती. आ दुर्रांनी यांची उमेदवारी नसल्याने राकाँ चे मतदार नाराजी व्यक्त करत होते मात्र वरिष्ठांनी आ दुर्रांनी यांना योग्य ती संधी दिली जाणार असल्याची ग्वाही दिल्याने आता पाथरीतील राकाँ चे सर्व मतदार हे एकदिलाने सुरेश देशमुख यांच्या पाठीशी खंबिर पणे उभे राहाणार असल्याची ग्वाही सेमवारी झालेल्या बैठकीत देण्यात आली.

No comments:

Post a Comment