तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 17 May 2018

मुंबई मधील पहिले पुस्तक उद्यान दिमाखदार सोहळ्यात गिरगावात सुरू

बाळू राऊत
मुंबई .दि.१७ मुंबईकरांना यापुढं फिरायला किंवा खेळायलाच नाही, तर अगदी वाचायला देखील उद्यानात जाता येणार आहे. कारण गिरणगावातल्या परळ भागात आजपासून चक्क पुस्तक उद्यान सुरू होतंय... मुंबईतलं हे अशाप्रकारचं पहिलंच उद्यान असणार असून, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे. वाचन संस्कृती टिकून रहावी तसंच नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी शिवसेना आमदार अजय चौधरी यांच्या संकल्पनेतून हे उद्यान सुरू होतंय... आत्मचरित्र, नाट्यसंपदा, काव्यसंग्रह, बालसाहित्य अशा प्रकारातली अनेक पुस्तकं या उद्यानात वाचनासाठी उपलब्ध असणार आहे.

विविध विभाग
नाट्य कला विश्वातील माहिती देणारं 'नाट्यसंपदा', जुन्या-नव्या कवींच्या शब्दसंपत्तीचं  'काव्यसंग्रह', तंत्रज्ञान जगतातील माहिती देणार विज्ञान, चिमुरड्यांच्या आवडीच 'बालसाहित्य', थोर मोठ्यांची जिवनगाथा सांगणार 'चरित्र आत्मचरित्र', समृद्ध इतिहासाला उजाळा देणारं 'ऐतिहासिक' आणि महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास सांगणारी 'गाथा संघर्षाची' अशा विभागात तुम्हाला ही पुस्तक वाचता येणार आहेत.

No comments:

Post a Comment